Jammu-Kashmir : काश्मिर खोर्‍यात दहशतवाद्यांचा उच्छाद सुरूच; आणखी एका सरपंचाची हत्या

या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कुलगाम परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. त्याचबरोबर हल्लेखोरांच्या शोधासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. जिल्ह्यातील आडोरा भागात दहशतवाद्यांनी सरपंच शब्बीर अहमद मलिक यांना लक्ष्य करून गोळीबार केला.

Jammu-Kashmir : काश्मिर खोर्‍यात दहशतवाद्यांचा उच्छाद सुरूच; आणखी एका सरपंचाची हत्या
कुपवाडामध्ये अंमली पदार्थ आणि आयईडीसह 3 संशयितांना अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 10:41 PM

श्रीनगर : काश्मिर खोर्‍यात दहशतवादी सक्रीय झाले असून त्यांनी हल्ल्यांचे सत्र सुरूच ठेवले आहे. दोन दिवसांपूर्वी श्रीनगरमधील एका गावच्या सरपंचाची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी आणखी एका सरपंचाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. काश्मिरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यां (Terrorist)नी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कुलगाम परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. त्याचबरोबर हल्लेखोरांच्या शोधासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. जिल्ह्यातील आडोरा भागात दहशतवाद्यांनी सरपंच शब्बीर अहमद मलिक यांना लक्ष्य करून गोळीबार केला. या हल्ल्यात सरपंचाचा जागीच मृत्यू झाला. (Terrorist assassinates another sarpanch in Kashmir Valley)

लश्कर-ए-तोयबाने बुधवारी केली होती दुसर्‍या सरपंचाची हत्या

बुधवारी श्रीनगरमधील खोनमोह भागात एका सरपंचाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. समीर अहमद भट असे त्या सरपंचाचे नाव आहे. लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या रेझिस्टन्स प्रâंट या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की, सरपंच भट यांना सुरक्षा पुरविण्यात आली होती. त्यांना श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. याचदरम्यान दहशतवाद्यांनी भट यांच्यावर हल्ला केला होता.

काल चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मिर खोर्‍यात गुरुवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली होती. पुलवाम्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांकडील दारुगोळा व शस्त्रास्त्रे जप्त केली. गुरुवारी सकाळी पुलवामा जिल्ह्यातील नैना बाटपोरा येथे पहिली चकमक झाली. यात दोन दहशतवादी मारले गेले. ते दोन्ही दहशतवादी ‘लष्कर-ए-तोएबा’शी संबंधित असल्याचे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले. दुसरीकडे, श्रीनगरच्या हजरतबल भागात एका दहशतवाद्याला चकमकीत ठार करण्यात आले, तर दोघे पळून गेले. यावरून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे स्पष्ट होत आहे.

इतर बातम्या
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.