AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Terrorist Attack in Jammu-Kashmir : बांदीपोरामध्ये सुरक्षा दलांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, एक पोलीस शहीद, 4 जखमी

  जम्मू -काश्मीरच्या (Jammu-Kashmir) बांदीपोरामध्ये (Bandipora) सुरक्षादलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला (Terrorist Attack in Jammu-Kashmir) झाल्याची घटना समोर आली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांच्या वतीने या हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे.

Terrorist Attack in Jammu-Kashmir : बांदीपोरामध्ये सुरक्षा दलांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, एक पोलीस शहीद, 4 जखमी
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 8:52 PM

श्रीनगर :  जम्मू -काश्मीरच्या (Jammu-Kashmir) बांदीपोरामध्ये (Bandipora) सुरक्षादलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला (Terrorist Attack in Jammu-Kashmir) झाल्याची घटना समोर आली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांच्या वतीने या हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेमध्ये एक पोलीस शहीद झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवादी आजूनही याच परिसरात असून, हल्ल्यानंतर पोलिसांनी या परिसराची नाकाबंदी केली असून, दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीर पोलीस आणि भारतीय जवानांच्या संयुक्त पथकाकडून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबली जात आहे. सर्च ऑपरेशन सुरू असतानाच दहशतवाद्यांनी पथकावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम

सध्या जम्मू -काश्मीरमध्ये पोलीस आणि भारतीय जवानांच्या मदतीने दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गंत जम्मू -काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. यामुळे दहशतवादी देखील सावध झाले असून, दहशतवाद्यांकडून जम्मू -काश्मीर पोलीस आणि भारतीय जवानांवर छुपे हल्ले करण्यात येत आहे. आज असाच एक भ्याड हल्ला दहशतवाद्यांकडून पोलीस पथकावर करण्यात आला. या हल्ल्यामध्ये एक पोलीस शहीद झाला आहे. तर चार पोलीस जखमी झाले आहे. जखमी पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांकडून परिसराची नाकेबंदी

काही दिवसांपूर्वीच अरुणाचल प्रदेशमध्ये आलेल्या हिमवादळात काही भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यामध्ये एक पोलीस शहीद झाला आहे. तर चार पोलीस जखमी झाल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

क्रिप्टो ट्रॅकर: कर म्हणजे मान्यता नव्हे, क्रिप्टोकरन्सीवर अर्थमंत्र्यांची राज्यसभेत माहिती

धर्म आणि जातीच्या मुद्यावर लोकांची पोटं भरत नाहीत, बेरोजगारी, महागाई आणि शेतीच्या प्रश्नांवर प्रियंका गांधींनी भाजपला घेरले

Goa Election | नाना पटोले यांच्याशी झालेल्या भेटीचा फोटो tweet करताना संजय राऊत म्हणतात, हम…

छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.
फरार कृष्णा आंधळेचे पुरावे जिच्याकडे 'ती' महिला कोण? मोठी माहिती समोर
फरार कृष्णा आंधळेचे पुरावे जिच्याकडे 'ती' महिला कोण? मोठी माहिती समोर.
हल्ल्यानंतर भारतीय सैन्य अ‍ॅक्शनमोडमध्ये, दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त
हल्ल्यानंतर भारतीय सैन्य अ‍ॅक्शनमोडमध्ये, दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त.
सिंधूत पाणी वाहील किंवा..,मोदींच्या वॉटर स्ट्राईकनंतर भुट्टोचं वक्तव्य
सिंधूत पाणी वाहील किंवा..,मोदींच्या वॉटर स्ट्राईकनंतर भुट्टोचं वक्तव्य.
दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये धास्ती, काश्मीरकडे पर्यटकांची पाठ
दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये धास्ती, काश्मीरकडे पर्यटकांची पाठ.
पहलगाम हल्ल्यात आदिल, नजाकत अन् सज्जाद पर्यटकांसाठी ठरले देवदूतच...
पहलगाम हल्ल्यात आदिल, नजाकत अन् सज्जाद पर्यटकांसाठी ठरले देवदूतच....