श्रीनगरमध्ये सरकारी शाळेवर दहशतवादी हल्ला! सर्वासामान्य नागरिकांवर गोळीबार, 2 शिक्षकांचा मृत्यू
दहशतवाद्यांनी सर्वसामान्य नागरिकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या शिक्षकांची ओळख पटवण्यात आली आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील एका ईदगाहवर गुरुवारी दहशतवादी हल्ला झाला. यावेळी दहशतवाद्यांनी सर्वसामान्य नागरिकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या शिक्षकांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यातील एक पुरुष शिक्षक असून ते एक काश्मिरी पंडित आहेत. सध्या ते बटामालू श्रीनगरमध्ये वास्तव्याला होते. त्यांची ओळख दीपक चंद म्हणून पटवण्यात आली आहे. (Terrorist attack on a school in Srinagar, Jammu and Kashmir)
दुसरा मृत व्यक्ती ही महिला शिक्षिक आहे. त्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. त्या महिलेची ओखळही पटवण्यात आली आहे. त्या अलोची बाग श्रीनगरच्या रहिवासी होत्या. आरपी सिंहची पत्नी सतिदनेर कौर अशी मृत शिक्षिकेची ओळख पटली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्यता दरम्यान दहशतवाद्यांनी श्रीनगर जिल्ह्यातील संगम ईदगाह परिसरात दोन शिक्षकांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घालून दहशतवाद्यांचा शोध सुरु केलाय.
Two teachers killed in a terrorist attack at a government school in the Iddgah Sangam area of Srinagar: Jammu and Kashmir Police
— ANI (@ANI) October 7, 2021
जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितलं की परिसरात भीती, सांप्रदायिक विद्वेष पसरवण्यासाठी हा हल्ला करण्यात आला आहे. स्थानिक मूल्यांना लक्ष्य करुन स्थानिक काश्मिरी मुस्लिमांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. तसंच पाकिस्तानातील एजन्सीच्या निर्देशानुसार हा हल्ला घडवून आणल्याचं जम्मू-काश्मीर डीजीपींनी म्हटलंय.
These recent incidents of targeting civilians are to create an atmosphere of fear, communal disharmony here. This is a conspiracy to target the local ethos & values & defame local Kashmiri muslims. This is being done on instructions from agencies in Pak: J&K DGP Dilbag Singh pic.twitter.com/HPsDLKZOl5
— ANI (@ANI) October 7, 2021
माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांकडून दु:ख व्यक्त
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करुन श्रीनगरमधील दहशतवादी हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त केलंय. ‘टार्गेट हत्यांचा अजून एक सेट, यावेळी शहरातील ईदगाही परिसरात एका सरकारी शाळेच्या दोन शिक्षकांची हत्या. दहशतवादाच्या या अमानवीय कृत्याची निंदा करण्यासाठीही शब्द नाहीत. मृतांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी मी प्रार्थना करतो’.
Shocking news coming in again from Srinagar. Another set of targeted killings, this time of two teachers in a Govt school in Idgah area of the city. Words of condemnation are not enough for this inhuman act of terror but I pray for the souls of the deceased to rest in peace.
— Omar Abdullah (@OmarAbdullah) October 7, 2021
इतर बातम्या :
गायीला वाचवताना डबल डेकर बस ट्रकवर धडकली, दोन्ही वाहनांचा चक्काचूर, 13 प्रवाशांचा मृत्यू
तोपर्यंत मी लढतच राहणार, पीडितांच्या कुटुंबाला मी वचन दिलंय; प्रियंका गांधींचा योगी सरकारला इशारा
Terrorist attack on a school in Srinagar, Jammu and Kashmir