संतापजनक! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हैदोस सुरुच, भारतीय सैन्याच्या गाडीला केलं टार्गेट

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी कारवाया डोकेवर काढताना दिसत आहेत. दहशतवाद्यांनी यावेळी गुलमर्ग परिसरात भारतीय सैन्याच्या वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यात 5 जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

संतापजनक! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हैदोस सुरुच, भारतीय सैन्याच्या गाडीला केलं टार्गेट
काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या गाडीवर दहशतवाद्यांचा हल्ला
Follow us
| Updated on: Oct 24, 2024 | 8:50 PM

जम्मू-काश्मीरमध्ये काही केल्या दहशवाद्यांच्या नापाक कृत्यांचा सर्वनाश होताना दिसत नाहीय. दहशतवाद्यांनी आज पुन्हा एकदा भारतीय सैन्याच्या वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय सैन्यातील 5 जवान जखमी झाल्याची माहिती आहे. हल्लेखोर दहशतवादी संबंधित परिसरात दबा धरुन बसले होते. त्यांनी भारतीय सैन्याची गाडी जात असताना अचानक हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यानंतर तातडीने कंट्रोल रुमला माहिती देण्यात आली. त्यानंतर तातडीने पोलीस आणि सैन्य दलाचं पथक घटनास्थळाकडे रवाना करण्यात आलं. सर्व जवानांना भारतीय सैन्याच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सर्व जखमी जवानांवर सध्या उपचार सुरु आहेत. पण दहशतवाद्यांच्या या हल्ल्यामुळे सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त केला जातोय.

जम्मू-काश्मीरच्या गुलमर्ग जवळ भारतीय सैन्याच्या गाडीवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 5 जवान आणि 1 पोर्टर जखमी झाला आहे. गुलमर्ग येथे 18 राष्ट्रीय रायफल्सच्या गाडीवर हल्ला झाला आहे. सैन्याची गाडी बोटपाथरी येथून जात होती. हा परिसर नियंत्रण रेषेपासून 5 किमी अंतरावर आहे. बोटपाथरी येथून जात असताना अचानक दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या गाडीवर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं.

काश्मीरमध्ये बाहेर राज्यातील मजुरांवर हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरात दहशतवाद्यांनी एका उत्तर प्रदेशातील मजुराची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. याआधी रविवारी गांदरबाल जिल्ह्यात दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 6 मजुरांसह एका स्थानिक डॉक्टराचा मृत्यू झाला होता. तसेच दहशतवाद्यांनी 18 ऑक्टोबरला शोपिया जिल्ह्यात बिहारच्या एका मजुराची गोळी झाडून हत्या केली होती.

Non Stop LIVE Update
नवाब मलिक यांना सर्वात मोठा धक्का, अजितदादा गटाचा मोठा निर्णय काय?
नवाब मलिक यांना सर्वात मोठा धक्का, अजितदादा गटाचा मोठा निर्णय काय?.
अमित शाहांना वेगळंच टेन्शन, भाजप नेत्यांना काय केल्या थेट सूचना?
अमित शाहांना वेगळंच टेन्शन, भाजप नेत्यांना काय केल्या थेट सूचना?.
राष्ट्रवादीच्या पक्ष-चिन्हाची 6 नोव्हेंबरला सुनावणी, कोर्टात काय घडलं?
राष्ट्रवादीच्या पक्ष-चिन्हाची 6 नोव्हेंबरला सुनावणी, कोर्टात काय घडलं?.
विधानसभेच्या रिंगणात उतरताच रोहित पाटलांच तुफान भाषण, आबांची आठवण अन्
विधानसभेच्या रिंगणात उतरताच रोहित पाटलांच तुफान भाषण, आबांची आठवण अन्.
महायुतीच्या 18 जागांचा पेच शाहांच्या दरबारी सुटणार? CM आणि DCM दिल्लीत
महायुतीच्या 18 जागांचा पेच शाहांच्या दरबारी सुटणार? CM आणि DCM दिल्लीत.
धनंजय मुंडे परळीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हणाले, 'आज माझी बहीण..'
धनंजय मुंडे परळीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हणाले, 'आज माझी बहीण..'.
10 मिनिटांत कार्यक्रम.. जरांगेंच्या जीवाला धोका, बिश्नोई गँगकडून धमकी?
10 मिनिटांत कार्यक्रम.. जरांगेंच्या जीवाला धोका, बिश्नोई गँगकडून धमकी?.
यशोमती ठाकूर यांची बाईक रॅली, अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन
यशोमती ठाकूर यांची बाईक रॅली, अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन.
रोहित पवारांचा मोठा दावा, 'महायुती एका मतदारसंघात 30-40 कोटी रूपये...'
रोहित पवारांचा मोठा दावा, 'महायुती एका मतदारसंघात 30-40 कोटी रूपये...'.
शंभूराज देसाईंना शिवसेनेकडून तिकीट तर मविआकडून 'हा' नेता अपक्ष लढणार?
शंभूराज देसाईंना शिवसेनेकडून तिकीट तर मविआकडून 'हा' नेता अपक्ष लढणार?.