Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार, पोलिस अधिकारी गंभीर जखमी
श्रीनगरच्या हरिसिंह हाय स्ट्रीट परिसरात दहशतवाद्यांनी सुरक्षा कर्मचार्यांच्या एका ग्रुपवर ग्रेनेड फेकले. त्या ग्रेनेडचा रस्त्याच्या कडेला स्फोट झाला. या स्फोटात आसपासच्या परिसरात वावरत असलेले चार नागरिक जखमी झाले. या जखमींमध्ये मोहम्मद शफी, त्याची पत्नी तन्वीरा, दुसरी महिला असमत आणि पोलिस निरीक्षक तनवीर हुसेन यांचा समावेश आहे.
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीर खोर्यात दहशतवाद्यांकडून पोलिसांना टार्गेट करण्याचे सत्र सुरूच राहिले आहे. दहशतवाद्यांनी सोमवारी पुन्हा एकदा बटामालू भागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षकावर (Police Inspector) गोळ्या झाडल्या. त्यात संबंधित पोलिस निरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत. जम्मू काश्मिर पोलिसांनी दहशतवाद्यां (Terrorist)च्या हल्ल्याची माहिती दिली. या घटनेच्या आधी श्रीनगरमधील हरिसिंह हाय स्ट्रीट परिसरात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड फेकल्याची घटना घडली. या हल्ल्यात चार जण जखमी झाले होते. जखमींमध्ये एक पोलिस कर्मचारी आणि दोन महिलांचा समावेश आहे. चीन आणि पाकिस्तान सीमेवर तणाव कायम असतानाच जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याचे प्रकार सुरू ठेवले आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा डळमळीत करण्याचा दहशतवादी संघटनांचे कट-कारस्थान उजेडात येत आहे. (Terrorist firing on police inspector in Jammu and Kashmir, Officers seriously injured in the attack)
श्रीनगरच्या हरिसिंह हाय स्ट्रीट परिसरात दहशतवाद्यांनी सुरक्षा कर्मचार्यांच्या एका ग्रुपवर ग्रेनेड फेकले. त्या ग्रेनेडचा रस्त्याच्या कडेला स्फोट झाला. या स्फोटात आसपासच्या परिसरात वावरत असलेले चार नागरिक जखमी झाले. या जखमींमध्ये मोहम्मद शफी, त्याची पत्नी तन्वीरा, दुसरी महिला असमत आणि पोलिस निरीक्षक तनवीर हुसेन यांचा समावेश आहे.
दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई सुरु
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे. 23 फेब्रुवारीला देखील सुरक्षा दलांनी शोपियान जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत शोपियान जिल्ह्यात लष्कराच्या दोन दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. या दहशतवाद्यांकडून एक एके 47 रायफल, एक मॅगझिन आणि 24 एके दारूगोळा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
दहशतवाद्यांकडून खोऱ्यातील कर्मचारी लक्ष्य
खोऱ्यातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना दहशतवादी लक्ष्य करत आहेत. डिसेंबर 2021 मध्येही श्रीनगरच्या बाहेरील जेवानमध्ये दहशतवाद्यांनी पोलिस बसवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात 14 पोलीस जखमी झाले, त्यापैकी दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवान भागातील पांथा चौकात हा हल्ला झाला. हल्ल्यानंतर परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून सर्व जखमी पोलिसांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच दिवशी सकाळी श्रीनगरच्या रुगरात भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. (Terrorist firing on police inspector in Jammu and Kashmir, Officers seriously injured in the attack)
इतर बातम्या