J&K Attack : जम्मू कश्मीरात दहशतवाद्यांचा पुन्हा ग्रेनेड हल्ला; पोलिसासह 23 नागरिक जखमी, एकाचा मृत्यू

या ग्रेनेडच्या स्फोटाचा मोठा आवाज परिसरात आल्यानंतर बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच पळापळ झाली. या ग्रेनेड हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला, तर 23 हून अधिक नागरिक जखमी झाले. जखमींमध्ये एका पोलिस कर्मचार्‍याचाही समावेश आहे.

J&K Attack : जम्मू कश्मीरात दहशतवाद्यांचा पुन्हा ग्रेनेड हल्ला; पोलिसासह 23 नागरिक जखमी, एकाचा मृत्यू
कुपवाडामध्ये अंमली पदार्थ आणि आयईडीसह 3 संशयितांना अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 9:54 PM

श्रीनगर : एकीकडे जगभर रशिया विरुद्ध युक्रेनच्या युद्धाची दहशत असताना भारताच्या सीमेवरही दहशतवाद्यांनी हल्ल्यांचे सत्र सुरूच ठेवले आहे. जम्मू-काश्मीरच्या खोर्‍यात अलिकडच्या काही महिन्यांपासून सुरक्षा दलांना टार्गेट करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातच रविवारी श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला (Grenade Attack) केला. हरि सिंह हायस्ट्रीटच्या मार्केटमध्ये तैनात असलेल्या सुरक्षा दला (Security Force)च्या तुकडीला दहशतवाद्यांनी टार्गेट केला. या सुरक्षा दलाच्या तुकडीच्या दिशेने दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला होता. मात्र निशाणा चुकल्यामुळे त्या ग्रेनेडचा दुसर्‍या जागी जाऊन स्फोट झाला. यात एका नागरिकाचा मृत्यू झाला, तर पोलिस कर्मचार्‍यासह 20 हून अधिक नागरिक जखमी झाले. (Terrorist grenade attack again in Jammu and Kashmir, One killed, 23 injured, including police)

वर्दळीच्या मार्केटमध्ये करण्यात आला स्फोट; मृतांचा आकडा वाढण्याची भिती

श्रीनगरमध्ये प्रसिद्ध आणि वर्दळीचा मानला जाणार्‍या अमीरा कदल बाजारात दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे या बाजारात प्रचंड गर्दी झाली होती. त्याचदरम्यान दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला. या ग्रेनेडच्या स्फोटाचा मोठा आवाज परिसरात आल्यानंतर बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच पळापळ झाली. या ग्रेनेड हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला, तर 23 हून अधिक नागरिक जखमी झाले. जखमींमध्ये एका पोलिस कर्मचार्‍याचाही समावेश आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे. श्रीनगर पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

ग्रेनेड हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही

हल्ल्याबाबत एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, रविवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी हरिसिंह हाय स्ट्रीटवर तैनात असलेले पोलीस आणि सुरक्षा दलांवर ग्रेनेडने हल्ला केला. हल्ल्यातील जखमींना श्री महाराजा हरिसिंह रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून हल्लेखोर दहशतवाद्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने परिसरात सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे, असे पोलिस अधिकार्‍याने सांगितले. दरम्यान, या ग्रेनेड हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान श्रीनगरमध्ये हा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांत जम्मू-काश्मीर पोलीस आणि निमलष्करी दलाने अनेक मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यामुळे दहशतवादी खवळले आहेत. (Terrorist grenade attack again in Jammu and Kashmir, One killed, 23 injured, including police)

इतर बातम्या

अकोल्यात जातीचे खोटे प्रमाणपत्रावर महाबीजमध्ये नोकरी मिळवणाऱ्या 11 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई

Malegaon Accident : मालेगावात टेम्पोचा भीषण अपघात, 4 जण जागीच ठार तर 15 जखमी, घटना कशी घडली?

Non Stop LIVE Update
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.