दहशतवादी फंडिंग प्रकरणात तुरुंगात बंद असलेला आरोपी खासदार म्हणून आला निवडून

लोकसभा निवडणुकीचा निकाला जाहीर झाला आहे. अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल समोर आला आहे. अनेक मोठ्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण यादरम्यान एक असाही व्यक्ती खासदार म्हणून निवडून आला आहे ज्याच्यावर गंभीर आरोप आहे आणि तो तुरुंगात बंद आहे.

दहशतवादी फंडिंग प्रकरणात तुरुंगात बंद असलेला आरोपी खासदार म्हणून आला निवडून
Follow us
| Updated on: Jun 06, 2024 | 8:14 PM

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर झाला आहे. हा निकाल लागताना काही ठिकाणी फटाके फोडण्यात आले, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावे म्हणून कार्यकर्ते मेहनत घेत असतात. उमेदवार कसा आहे यावर त्याची लोकप्रियता ठरते. त्यांच्या विजयाचं गणित ठरतं. पण या लोकसभा निवडणुकीत एक धक्कादायक निकाल देखील आला आहे. टेरर फंडिंग प्रकरणातील आरोपी खासदार म्हणून निवडून आला आहे. इंजिनिअर रशीद याने जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. आता त्याने खासदार म्हणून शपथ घेण्यासाठी अंतरिम जामीन मागितला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात त्याने धाव घेतली आहे.

ओमर अब्दुल्ला यांचा पराभव

अतिरिक्त सत्र न्यायाधीश (एएसजे) चंदर जीत सिंग यांनी गुरुवारी या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. रशीद याने जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव करून विजय मिळवला आहे.

UAPA अंतर्गत तिहारमध्ये बंद

अब्दुल रशीद उर्फ ​​इंजिनिअर रशीद सध्या यूएपीए अंतर्गत दहशतवादी फंडिंग प्रकरणात तिहार तुरुंगात बंद आहे. ते दोन वेळा आमदारही झाले आहेत. बारामुल्लाची जागा त्यांनी प्रचंड मतांनी जिंकली आहे.

तुरुंगात असल्याने रशीद यांच्या दोन मुलांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यांना लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला. त्यांच्या रॅलीत मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले. मतदानातील ही लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. प्रचारादरम्यान ते काश्मिरी भाषेत – चुन जू, म्यून जू, कैदी नंबर कुनवू अशा घोषणा देण्यात आल्या. हिंदीत याचा अर्थ तेरी जान, मेरी जान, कैदी नंबर 19 असा होतो. प्रेशर कुकरचे बटण दाबून रशीदला तिहारमधून बाहेर पडण्यास मदत करावी, असा प्रचार त्यांनी केला होता.

2008 मध्ये राशिद इंजिनिअर कुपवाडाच्या लंगेट विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आला. 2013 मध्ये त्याने स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि त्याचे नाव अवामी इत्तेहाद पार्टी असे ठेवले

2014 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा आमदार झाला. त्याच वर्षी बारामुल्लामधून लोकसभा निवडणूकही लढवली पण पराभवाचा सामना करावा लागला होता.

2015 मध्ये, भाजपच्या काही आमदारांनी  बीफ पार्टी बोलावल्याच्या आरोपावरून जम्मू-काश्मीर विधानसभेत मारहाणही केली होती. यानंतर 2015 मध्ये झालेल्या एका घटनेत दिल्लीच्या प्रेस क्लबमध्ये काही लोकांनी त्यांच्यावर काळी शाई फेकली होती.

लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.