हैदराबाद विमानतळावर पंतप्रधानांच्या स्वागताला मुख्यमंत्र्यांची दांडी, सकाळी यशवंत सिन्हांच्या स्वागतासाठी मात्र मंत्रिमंडळासह हजेरी
भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणी हैदराबादेत होत असल्याने, त्याविरोधात केसीआर आणि सिन्हा यांची बाईक रॅली हैदराबादेत काढण्यात आली. एयरपोर्टपासून जलविहारपर्यंत झालेल्या या रॅलीत मुख्यमंत्री आणि यशवंत सिन्हा हे सहभागी झाले होते. केसीआर यांचा तेलंगणा राष्ट्र समिती आणि भाजपा या दोघांमध्ये रस्त्यावर पोस्टर वॉर दिसून आले.
हैदराबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सामील होण्यासाठी शनिवारी हैदराबादला पोहचले. त्यांच्या स्वागतासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (CM KCR)हे आलेच नाहीत. गेल्यासहा महिन्यांत तिसऱ्यांदा असे घडले आहे. यापूर्वी मे आणि फेब्रुवारीतही केसीआर हे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी विमानतळावर आले नव्हते. तेलंगणा राष्ट्र समितीच्या वतीने केवळ एकच मंत्री पंतप्रधानांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होता. दुसरीकडे काही तासांपूर्वीच विरोधकांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha)हेही हैदराबादमध्ये दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी केसीआर सगळ्या मंत्रिमंडळासह उपस्थित राहिले होते.
धर्मेंद्र प्रधान यांची केसीआर यांच्यावर टीका
या प्रकारानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट करुन तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. सहकारी संघवाद हा लोकशाहीचा पाया आहे. पुन्हा एकदा प्रोटोकॉलचे उल्लंघन करत, केसीआर यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या दोन्ही संस्थांचा अपमान केल्याची टीका त्यांनी केली आहे. केसीआर लपू शकतात पण त्यांचे भ्रष्ट राजकारण फार काळ लपू शकणार नाही, अशी टीकाही प्रधान यांनी केली आहे.
Cooperative federalism in letter and spirit is the cornerstone of our democracy.
Breaching protocol on purpose yet again, Telangana CM has insulted the institution of both that of a CM and PM. KCR can hide but his corrupt politics will not remain hidden. #BJPNECInTelangana
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) July 2, 2022
भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीविरोधात केसीआर आणि सिन्हा यांची बाईक रॅली
दरम्यान सकाळी विरोधकांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा हे सकाळी आमदारांचा पाठिंबा मागण्यासाठी हैदराबादला पोहचले. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी यशवंत सिन्हा यांना या निवडणुकीत पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणी हैदराबादेत होत असल्याने, त्याविरोधात केसीआर आणि सिन्हा यांची बाईक रॅली हैदराबादेत काढण्यात आली. एयरपोर्टपासून जलविहारपर्यंत झालेल्या या रॅलीत मुख्यमंत्री आणि यशवंत सिन्हा हे सहभागी झाले होते. केसीआर यांचा तेलंगणा राष्ट्र समिती आणि भाजपा या दोघांमध्ये रस्त्यावर पोस्टर वॉर दिसून आले. रस्त्यांवर केंद्र सरकारच्या योजना आणि केलेल्या कामांचे पोस्टर्स भाजपाकडून लावण्यात आले होते. तर तेलंगणा राष्ट्र समितीच्या वतीने मुख्यमंत्री केसीआर आणि यशवंत सिन्हा यांचे पोस्टर्स लावण्यात आले होते.
गेल्या महिन्यात केसीआर यांनी बंगळुरुत घेतली होती देवेगौडांची भेट
पंतप्रधान मे महिन्यात २६ तारखेला हैदराबादला एका कार्यक्रमासाठी आले होते. त्या दिवशी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा आणि त्यांचे पुत्र कुमारस्वामी यांना भेटण्यासाठी बंगळुरुत गेले होते. त्यापूर्वी फेब्रुवारीत वसंत पंचमीच्या दिवशी पंतप्रधान मोदी हैदराबादला आले होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी प्रतिमेचे लोकार्पण केले होते. त्याहीवेळी तब्येत बरी नसल्याचे कारण देत केसीआर यांनी पंतप्रधानांची भेट टाळली होती.