Accident | कंटेनर रिक्षावर पडला! रिक्षातील चार जणांनी जागीच जीव सोडला
सकाळी सहा साडे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असावा, असं संगितलं जातंय. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातग्रस्त कंटेनर जप्त करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : दिल्लीत (Delhi) शनिवारी सकाळी एक भीषण अपघात झाला असून या अपघातात (Accident) चार जणांचा मृत्यू झालाय. शनिवारी सकाळी दिल्लीतील आईटीओजवळ (ITO) असलेल्या रिंग रोडवर (Ring Road) हा अपघात झाला. एका कंटेनर (Container) थेट रिक्षावर (autorickshaw) पडला. दुर्दैवानं रिक्षातून जात असलेल्या चारही प्रवाशांचा या अपघातात जागीच जीव गेलाय.
कंटेनर चालक फरार
या अपघातानंतर कंटेनरचा चालक घटनास्थळावरुन फरार झाला. त्यानंतर एकच गर्दी अपघात झालेल्या ठिकाणी जमली होती. पोलिसांनी या अपघाताची तत्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी या अपघाताप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.
रिक्षाचालकाही जागीच दगावला!
अपघातातील मृत व्यक्ती कोण आहेत, याचीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मृतांची ओळख पटवण्याचे पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, मृतांमध्ये रिक्षा चालकाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अपघातातील कुणाचीच नावं अद्याप समोर आलेली नाहीत. पोलिस याप्रकरणी आता अधिक तपास करत आहेत.
किती वाजताची घटना?
शनिवारी सकाळी सहा साडे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असावा, असं संगितलं जातंय. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातग्रस्त कंटेनर जप्त करण्यात आला आहे.
कशामुळे झाला अपघात?
अपघातग्रस्त कंटेनरमध्ये आढळलेल्या काही कागदपत्रांच्या आधारे फरार कंटेनरच्या चालकाचा शोध घेतला जात असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, नेमक्या कोणत्या कारणानं हा अपघात झाला, हेही स्पष्ट जालेलं नाही. मात्र कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. कंटेनरमध्ये गरजेपेक्षा जास्त सामान लोड करण्यात आलं होतं का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा –
ओमिक्रॉनचा वाढता धोका! नवी मुंबईच्या एकाच शाळेतील 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, चिंता वाढली
‘किंग कोहली का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान’, #WorldStandsWithKohli ट्रेंडिंगमध्ये
Petrol Rate Today | शहरात पेट्रोल-डिझेलचे भाव काय आहेत, घ्या जाणून एका क्लिकवर
बंगळुरुत छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना, कोल्हापूर, बेळगावमधील शिवप्रेमी संतापले!
वीजबिलाच्या पैशांवरून वाद, घरमालकाने केली भाडेकरूची हत्या; पत्नीवरही केला प्राणघातक हल्ला