3D Printed Post Office : अवघ्या 43 दिवसांत 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिसचा श्रीगणेशा! काय आहे तंत्रज्ञान

3D Printed Post Office : देशातील पहिल्या 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिसचा श्रीगणेशा झाला. आज या पोस्ट ऑफिसचे उद्धघाटन झाले. अवघ्या 43 दिवसांत 3D प्रिंटेड पोस्ट तयार झाले आहे. लार्सन अँड टुब्रो आणि आयआयटी मद्रासने त्याच्या उभारणीसाठी मोलाची साथ दिली.

3D Printed Post Office : अवघ्या 43 दिवसांत 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिसचा श्रीगणेशा! काय आहे तंत्रज्ञान
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 6:15 PM

नवी दिल्ली | 18 ऑगस्ट 2023 : देशातील पहिल्या वहिल्या 3D प्रिंटिंग पोस्ट ऑफिसचा (3D Printed Post Office) श्रीगणेशा आज झाला. या अनोख्या टपाल कार्यालयाचे उद्धघाटन शुक्रवारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले. 3D प्रिंटिंगचा वापर देशाला नवीन नाही. हा प्रयोग यापूर्वी पण झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाआधारे ही वास्तू दिमाखात उभी ठाकली आहे. अवघ्या 43 दिवसांत 3D प्रिंटेड पोस्ट तयार झाले आहे. लार्सन अँड टुब्रो आणि आयआयटी मद्रासने त्याच्या उभारणीसाठी मोलाची साथ दिली. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की 3D प्रिंटेड टपाल कार्यालयाची उभारणी का करण्यात आली. त्याचा कशासाठी उपयोग होईल. त्यातील सेवा-सुविधा काही वेगळ्या असतील का? देशात आता अशा पोस्ट ऑफिसचा प्रयोग इतर ठिकाणी पण होणार आहे का, या टपाल कार्यालयामुळे खर्चात मोठी कपात झाली का?

कौतुकाचा वर्षाव

हे सुद्धा वाचा

या कामावर मंत्री महोदयांना आयआयटी मद्रास आणि लार्सन अँड टुब्रो यांनी ही अनोखी वास्तू उभारल्याबाबत पाठ थोपटली. ही नवीन भारताची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने अशा नवकल्पना समोर येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात 4G, 5G चे वारे येईल आणि त्याचे देशातच तंत्रज्ञान विकसीत होईल, असे कोणाला वाटले होते का, पण भारत प्रगती करत असल्याचे त्यांनी सांगितले.

झटपट झाले तयार

बेंगळुरु येथील केंब्रिज लेआऊटमध्ये ही इमारत उभी ठाकली आहे. ती अवघ्या 43 दिवसांत उभी झाली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 21 मार्च रोजी या 3D पोस्ट ऑफिसचे काम सुरु झाले होते. तेव्हापासूनच ही इमारत चर्चेत आली होती. अगदी कमी कालावधीत ही इमारत बांधून तयार झाली. पारंपारिक पद्धतीने त्यासाठी अजून वेळ लागला असता, तसेच पैसा ही अधिक खर्च झाला असता.

देशातील पहिले 3D टपाल कार्यालय

बेंगळुरु शहरात हे पहिले 3डी टपाल कार्यालय बांधून तयार झाले. लार्सन आणि टुब्रो कंपनीने हे काम केले. कंपनी भारतातील अनेक इमारतीच्या निर्मितीसाठी हे तंत्रज्ञान वापरत आहे. 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करणारी ही भारतातील एकमेव कंपनी आहे. इतर ठिकाणी पण कंपनी हे तंत्रज्ञान इमारत बांधकामासाठी वापरत आहे.

किती आला खर्च

या पोस्ट कार्यालयासाठी अंदाजे 25 लाख रुपये खर्च आला आहे. बेंगळुरु शहरातील उत्सुर बाजारात ही इमारत दिमाखात उभी आहे. 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानामुळे खर्चात बचत झाली. अंदाजे 25 टक्के खर्च वाचला. इमारत कमी कालावधीत उभी राहिली असली तरी गुणवत्तेत मात्र ती सरस आहे.

काय आहे 3D प्रिंटिंग?

3डी प्रिंटिंग संगणकाद्वारे इमारतीचे डिझाईन तयार करते. लेअर टू लेअर, थ्री डायमेन्शिनल डिझाईन तयार करण्यात येते. Additive Manufacturing वर हे 3D प्रिंटिंग अवलंबून असते. साध्या प्रिटिंग मशीनमध्ये शाई आणि कागदाचा वापर होतो. तर 3D प्रिंटिंगसाठी वस्तूचा आकार, रंग निश्चित होतो. त्यानुसार बांधकामाचे मटेरियल टाकण्यात येते. 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर खास करुन सुरक्षा आणि एअरोस्पेससाठी करण्यात येतो.

Non Stop LIVE Update
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो.
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण.
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस.
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी.
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?.
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500.
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?.
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर.
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा.
तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार 'लाडकी बहीण योजने'चा लाभ
तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार 'लाडकी बहीण योजने'चा लाभ.