2000 Rupees Note : अखेर लागला मुहूर्त! गुलाबी नोटा बदलण्यासाठी मुदतवाढ

2000 Rupees Note : अखेर दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी मुदतवाढीला उशीरा का असेना मुहूर्त लागलाच. आरबीआयने याविषयीचा निर्णय घेतला. 30 सप्टेंबरपर्यंत या गुलाबी नोटा बदलणे अथवा जमा करण्यासाठीची मुदत देण्यात आली होती. ही तारीख वाढण्याचे वृत्त शुक्रवारीच आले होते. त्यानुसार रिझर्व्ह बँकेने इतक्या दिवसांसाठी ही मुदत वाढवली.

2000 Rupees Note : अखेर लागला मुहूर्त! गुलाबी नोटा बदलण्यासाठी मुदतवाढ
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 6:16 PM

नवी दिल्ली | 30 सप्टेंबर 2023 : दोन हजार रुपयांच्या (2000 Rupees Note) नोटा बदलविण्यासाठी अखेर रिझर्व्ह बँकेने मुदतवाढ दिली. शुक्रवारीच याविषयीचे वृत्त येऊन धडकले होते. पण अधिकृत घोषणा झाली नव्हती. दुपारपर्यंत ही घोषणा न झाल्याने सर्वांनीच आशा सोडली होती. गेल्या वर्षभरापासून गुलाबी नोटा चलनातून गायब आहेत. यावर्षी 19 मे रोजी 2,000 रुपयांच्या नोटा माघारी बोलविण्याची घोषणा केली होती. त्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत या गुलाबी नोटा बदलणे अथवा जमा करण्यासाठीची मुदत देण्यात आली होती. आरबीआयच्या आकडेवारीनुसार आता केवळ 7 टक्के नोटा बाजारात आहेत. इतक्या तारखेपर्यंत आरबीआयने मुदत वाढ (Extended Date) दिली आहे.

93 टक्के नोटा माघारी

आतापर्यंत 3.32 लाख कोटी रुपये मूल्याच्या 2,000 रुपयांच्या नोटा (2000 rupee note) परत बोलाविण्यात आल्या होत्या. रिझर्व्ह बँकेने 2 सप्टेंबर रोजी दिलेल्या आकडेवारीनुसार, त्यातील 93 टक्के नोटा बँकांमध्ये जमा झाल्या आहेत. 31 जुलैपर्यंत 3.14 लाख कोटी रुपयांच्या 88 टक्के नोटा बँकेत जमा करण्यात आल्या होत्या. आरबीआयने 19 मे रोजी 2,000 रुपयांच्या नोट माघारी बोलविण्याची घोषणा केली होती. 23 मेपासून ही प्रक्रिया सुरु करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

अशा बदलवा नोटा

देशातील नागरिकांना या नोटा खात्यात जमा करा अथवा त्या बदलून घ्या. नोट एक्सचेंज करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. नागरिकांना सार्वजनिक बँका, व्यावसायिक माध्यम केंद्र आणि आरबीआयच्या 19 क्षेत्रीय कार्यालयात या नोटा बदलवून मिळतील.

एका दिवशी इतक्या नोटा बदला

आरबीआयच्या गाईडलाईननुसार, कोणत्याही व्यक्तीला 2000 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 20,000 रुपये बदलविता येतील. त्याच्याकडे कोणतीही विचारपूस न करता नोट बदलवून देण्यात येतील. एका दिवशी 20,000 रुपयांपर्यंत नोट बदलता येतील.

एक आठवड्यांची मुदतवाढ

शुक्रवारी ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत ही मुदतवाढ देण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. आता केवळ 7 टक्के नोटा बाजारात आहेत. आरबीआयने नोटा बदलविणे आणि त्या जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नागरिकांना आता 7 ऑक्टोबर 2023 रोजीपर्यंत गुलाबी नोटा बदलविता येतील. चुकून एखादी गुलाबी नोट घरात असेल तर लवकरात लवकर ती बदलून घ्या.  नाहीतर या नोटा रद्दी होतील.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.