पेगाससवरून अधिवेशनभर गोंधळ, आधी चर्चेची मागणी फेटाळली, आता केंद्र सरकारकडून एका ओळीचं उत्तर

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी पेगासस प्रकरणावरून केंद्र सरकारला धारेवर धरलं होतं. आता या मुद्द्यावर केंद्र सरकारनं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने इस्राईली स्पायवेअर कंपनी NSO सोबत कसलाही व्यवहार केलेला नाही असं संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

पेगाससवरून अधिवेशनभर गोंधळ, आधी चर्चेची मागणी फेटाळली, आता केंद्र सरकारकडून एका ओळीचं उत्तर
पेगासस प्रकरणावर संरक्षण मंत्रालयाचं उत्तर
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 6:18 PM

नवी दिल्ली : पेगासस हेरगिरी प्रकरणावरून (Pegasus Spyware) संसदेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) चांगलंच गाजत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी पेगासस प्रकरणावरून केंद्र सरकारला धारेवर धरलं होतं. आता या मुद्द्यावर केंद्र सरकारनं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने इस्राईली स्पायवेअर कंपनी NSO सोबत कसलाही व्यवहार केलेला नाही असं संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यसभेत संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट (Ajay Bhatt) यांनी यावर उत्तर दिलं आहे. (The Defence Ministry answered in Rajya Sabha that the govt has not done any business with the Israeli spyware company NSO)

पेगाससने गाजवलं अधिवेशन

19 जुलैला संसदेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू झालं. त्यादिवसापासून पेगासस (Pegasus) आणि इतर मुद्द्यांवर विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. त्यामुळे अनेकवेळा दोन्ही सभागृह तहकुब करावी लागली. संपूर्ण अधिवेशनात पेगासस हेरगिरी मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल चढवला. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी पेगाससवर संसदेत चर्चेची मागणी केली होती. चर्चा केल्याशिवाय शांत बसणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली होती. त्यानंतरही केंद्र सरकारकडून कसलंही उत्तर देण्यात आलं नव्हतं. संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी विरोधकांची ही मागणी फेटाळून लावली होती.

खासदाराचा पेगाससवर प्रश्न, संरक्षण मंत्रालयाचं एका ओळीचं उत्तर

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पेगाससचा मुद्दाच केंद्रस्थानी आहे. कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसभा सदस्य व्ही. शिवदासन (V Shivdasan) यांनी यांदर्भात राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता. गेल्या 3 वर्षांत संरक्षण मंत्रालयाने परदेशी वस्तुंच्या खरेदीवर किती निधी खर्च केला याबाबत त्यांनी माहिती मागितली. यामध्ये पेगाससशी संबंधित NSO समूहाचाही संदर्भ त्यांनी दिला. या प्रश्नावर संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी उत्तर दिलं. ”इस्त्रायली सायबरसुरक्षा फर्म एनएसओ ग्रुपशी कोणताही व्यवहार झालेला नाही”, असं अजय भट्ट यांनी सांगितलं आहे.

पेगासस(Pegasus) म्हणजे काय?

पेगासस (Pegasus) हा स्पायवेअरचा एक प्रकार आहे. हे लोकांच्या फोनद्वारे त्यांची हेरगिरी करते. पीबीएनएसच्या अहवालानुसार, पेगासस एक लिंक पाठवते आणि जर वापरकर्त्याने त्या लिंकवर क्लिक केले तर त्याच्या फोनवर मालवेअर किंवा देखरेखीसाठी परवानगी असलेला कोड इन्स्टॉल होतो. असे सांगितले जात आहे की मालवेअरच्या नवीन आवृत्तीसाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करणे आवश्यक नाही. एकदा पेगासस इन्स्टॉल झाल्यानंतर, हल्लेखोराकडे वापरकर्त्याच्या फोनची संपूर्ण माहिती असते.

एनएसओ ग्रुप काय आहे?

एनएसओ ग्रुप ही एक सायबर सिक्युरिटी कंपनी आहे जी ‘हेरगिरी तंत्रज्ञान’ मध्ये स्पेशालिस्ट आहे आणि जगभरातील सरकारे आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींना गुन्हे आणि दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी मदत करण्याचा दावा करते. एनएसओ ग्रुप 40 देशांमध्ये आपल्या ग्राहकांना 60 गुप्तचर, लष्करी आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून आपल्या ग्राहकांचे वर्णन करते.

संबंधित बातम्या :

Pegasus : पेगासस म्हणजे नेमके काय? हे काय आणि कसे कार्य करते?

ज्या पेगाससवर संसदेत रान उठलंय, ते नेमकं आहे काय, नेमकी हेरगिरी कशी केली जाते? वाचा सविस्तर

Pegasus प्रकरण गंभीर, सत्य समोर यायला हवं, सर्वोच्च न्यायालय काय म्हणालं? | Supreme Court

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.