Corona Vaccine : मोठी खूशखबर! कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सिन लसीचा डोस 225 रुपयांनी स्वस्त
कोरोनाच्या एकामागून एक आलेल्या लाटांमुळे लोकांनी खाजगी रुग्णालयातील लसीकरणालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता खाजगी रुग्णालयात नागरिकांना स्वस्त दरात लस उपलब्ध होणार आहे. सिरम इंस्टीट्युटचे पूनावाला यांनी याबाबत सर्वप्रथम ट्विट करून ही खुशखबर दिली.
नवी दिल्ली : देशातील सर्व प्रौढ नागरिकांना येत्या रविवारपासून कोविड लसीचा बूस्टर डोस देण्यास सुरुवात होणार आहे. त्याच्या एक दिवस आधी खाजगी रुग्णालयांमध्ये कोविशील्ड (Covishield) आणि कोवॅक्सिन (Covaxin) लसीच्या किमती निम्म्याहून अधिक कमी केल्या गेल्या आहेत. दोन्ही लसीच्या डोसची किंमत आता 225 रुपये असेल. कोविशील्डची किंमत 600 रुपयांवरून कमी करण्यात आली आहे, तर कोवॅक्सिनची किंमत प्रति डोस 1,200 रुपयांवरून कमी झाली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला आणि भारत बायोटेकच्या सहसंस्थापक सुचित्रा एला यांनी आज ट्विटरवर ही घोषणा केली. केंद्र सरकारशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशात 100 टक्के कोरोना लसीकरण होण्यास मोठी मदत होणार आहे. (The dose of Covishield and Covaxin vaccine is cheaper by Rs 225 in private hospitals)
पूनावाला आणि एला यांनी दिली दरकपातीची खूशखबर
कोरोनाच्या एकामागून एक आलेल्या लाटांमुळे लोकांनी खाजगी रुग्णालयातील लसीकरणालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता खाजगी रुग्णालयात नागरिकांना स्वस्त दरात लस उपलब्ध होणार आहे. सिरम इंस्टीट्युटचे पूनावाला यांनी याबाबत सर्वप्रथम ट्विट करून ही खुशखबर दिली. त्यांनी काल Covishield ची किंमत 600 रुपये अधिक कर असेल, असे जाहीर केले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी लसीच्या डोसची थेट 225 रुपयांपर्यंत कमी केल्याची खुशखबर दिली. “आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर सिरम इन्स्टिटयूटने खाजगी रुग्णालयांसाठी COVISHIELD लसीची किंमत 600 रुपये प्रति डोस वरून 225 रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
18 वर्षांवरील सर्व प्रौढ नागरिकांना बूस्टर डोस उपलब्ध करून देण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतो”, असे ट्विट पूनावाला यांनी आज केले. त्यापाठोपाठ भारत बायोटेकच्या सहसंस्थापक सुचित्रा एला यांनी कोवॅक्सिन लसीच्या दरकपातीची घोषणा केली. “सर्व प्रौढांसाठी प्रिकॉशन (बूस्टर) डोस उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. केंद्र सरकारशी सल्लामसलत करून आम्ही कोवॅक्सिन (COVAXIN ) लसीची किंमत खाजगी रुग्णालयांसाठी 1200 रुपयांवरून 225 रुपये प्रति डोस करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे ट्विट एला यांनी केले.
बूस्टर डोस न घेता परदेशात जाणाऱ्यांची व्हायची गैरसोय
पूनावाला यांनी काल 18 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी बूस्टर डोस उपलब्ध करण्याच्या केंद्राच्या घोषणेचे स्वागत केले होते. हा एक महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे त्यांनी म्हटले होते. ज्या लोकांना परदेशात प्रवास करण्याची इच्छा आहे, त्यांना तिसऱ्या डोसशिवाय दुसऱ्या देशांत जाणे मुश्किल झाले आहे. कारण अनेक देशांनी बूस्टर डोस न घेतलेल्यांवर निर्बंध घातले आहेत, असे नमूद करीत पुनावाला यांनी केंद्राच्या निर्णयाचे कौतुक केले होते.
“पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी सरकारी लसीकरण केंद्रांद्वारे सुरू असलेला मोफत लसीकरण कार्यक्रम तसेच आरोग्य सेवा कामगार, फ्रंटलाइन कामगार आणि साठ वर्षांवरील लोकसंख्येसाठी प्रिकॉशन (खबरदारीचा) डोस चालूच राहील. त्या मोहिमेला आणखी गती दिली जाईल,” असे काल जारी करण्यात आलेल्या सरकारी निवेदनात म्हटले आहे. (The dose of Covishield and Covaxin vaccine is cheaper by Rs 225 in private hospitals)
We are pleased to announce that after discussion with the Central Government, SII has decided to revise the price of COVISHIELD vaccine for private hospitals from Rs.600 to Rs 225 per dose. We once again commend this decision from the Centre to open precautionary dose to all 18+.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) April 9, 2022
इतर बातम्या
Rahul Gandhi: मी सत्तेच्या वर्तुळात वाढलो, पण मला सत्तेत स्वारस्य नाही: राहुल गांधी
Vadodara: गुजराती ड्रामा अर्टिस्ट प्राची मौर्य हत्या प्रकरणी बॉयफ्रेंडला जन्मठेपेची शिक्षा