Lok Sabha Elections: या दिवशी निवडणूक आयोगाकडून होऊ शकते निवडणुकीची घोषणा
लोकसभा निवडणुकीची घोषणा आता कोणत्याही दिवशी होऊ शकते. त्यासाठी काऊंटडाऊन सुरु झाले असून सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. भाजपने २ तर काँग्रेसने ही २ यादी जाहीर केल्या आहेत. ज्यामध्ये अनेक मोठ्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता निवडणूक आयोगाकडून देखील हालचाली वाढल्या आहेत.
Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. आता काउंटडाऊन सुरू झाले आहे. सध्या मिळालेल्या संकेतांनुसार 16 किंवा 17 मार्चला निवडणुकीची घोषणा होऊ शकते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा 10 मार्च रोजी करण्यात आली होती. सध्या निवडणूक आयुक्तांची दोन पदे रिक्त आहेत. त्यामुळे आधी ती भरली जाऊ शकतात. यासंदर्भात पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली निवड समितीची 14 मार्च रोजी महत्त्वाची बैठक होऊ शकते. या बैठकीनंतरच नियुक्तीचे आदेश निघू शकतात. त्यानंतर लगेचच निवडणुकीची घोषणा होऊ शकते.
निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर दौऱ्यानंतर निवडणूक तारखा जाहीर करण्याचे संकेत दिले होते. आयोगाचा १२ आणि १३ मार्चचा दौरा आज संपला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग येत्या दोन दिवसांत निवडणूक घोषणेशी संबंधित तयारीला अंतिम स्वरूप देईल, असे मानले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार आयोगाने 16 आणि 17 मार्चचे दिवस राखून ठेवले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना शहराबाहेर न जाण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगा 2019 च्या लोकसभा निवडणुकीची घोषणाही रविवारी करु शकते. ज्या प्रकारे निवडणुकीच्या हालचाली वाढल्या आहेत, त्यावरून लोकसभा निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते, हे स्पष्ट होत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेससारख्या पक्षांनी आतापर्यंत त्यांच्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत.
येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर इलेक्टोरल बाँड्सशी संबंधित माहिती सार्वजनिक करण्यासाठी निवडणूक आयोगावर येणारा दबाव यामुळे आयोगावर पुढील काही दिवस कामाचा बोजवारा असणार असल्याचे स्पष्ट होते. वास्तविक, ते १४ मार्चपासून सुरू होणार आहे. आयोगातील निवडणूक आयुक्तांची रिक्त पदे भरण्यासाठी निवड समितीची १४ मार्च रोजी बैठक होणार आहे. त्याच दिवशी रात्री उशिरापर्यंत त्यांच्या नियुक्तीचे आदेशही निघण्याची दाट शक्यता आहे.
15 मार्च रोजी त्यांनी निवडणूक रोख्यांसंबंधीची माहिती संकेतस्थळावर सार्वजनिक करायची असून, आदेश निघाल्यास दोन्ही आयुक्त एकाच दिवशी आपले काम सांभाळतील. त्याच वेळी, ते 16 आणि 17 मार्च रोजी कोणत्याही दिवशी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतात.