एक्झिट पोलने उडवली नेत्यांची झोप, निकालाआधी अपक्ष उमेदवारांचा वाढला भाव

assembly election Result : विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी आलेल्या एक्झिट पोलने सर्वच पक्षाच्या नेत्यांची चिंता वाढवली आहे. कारण अनेक एक्झिट पोलमध्ये त्रिशंकू परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे तर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अपक्षांची मदत घ्यावी लागली तर त्यासाठी नेते एक्टिव्ह झाले आहेत.

एक्झिट पोलने उडवली नेत्यांची झोप, निकालाआधी अपक्ष उमेदवारांचा वाढला भाव
assembly-election
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 2:02 PM

Rajasthan Election Result : 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्यास आता काही तास उरले आहेत. पण त्याआधी आलेल्या एक्झिट पोलमुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांची झोप उडाली आहे. एक्झिट पोलमध्ये कांटे की टक्कर दिसत आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारांचा भाव वाढला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर आहे. त्यामुळे आता सर्वच नेते निकालाआधी एक्टिव्ह झाले आहेत. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या देखील सक्रिय झाल्या आहेत. नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे खेचण्यासाठी आतापासूनच त्यांना संपर्क केला जात आहे.

३ डिसेंबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल

विधानसभा निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार आहेत. पण त्याआधी जर बहुमतासाठी काही अपक्ष उमेदवारांची मदत लागली तर आतापासूनच त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

जयपूरमध्ये वसुंधरा राजे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही बैठक घेतली. सकाळी वसुंधरा राजे यांनी मोतीडुंगरी गणेश मंदिराला भेट दिली. त्यांनी प्रार्थना केली आणि गणपतीचे आशीर्वाद घेतले.

राजस्थान अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार जर निवडून आले तर त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी खुद्द राजे यांच्यावर येऊ शकते.

दुसरीकडे काँग्रेसमध्ये देखील बंडखोरी झाली होती. बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढवणारे ५ उमेदवार हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जवळचे आहेत. तर माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या जवळचे ५ अपक्ष उमेदवार आहेत.

एक्झिट पोलने वाढवली काँग्रेस-भाजपची चिंता

राजस्थान विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर होणार आहेत. बहुतांश एक्झिट पोलने राज्यात भाजप सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तवली आहे. पण काही चॅनेलने काँग्रेस आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर असेल असं भाकित केले आहे. त्यामुळे वंसुधरा राजे सिंधिया आधीच एक्टिव्ह झाल्या आहेत.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि वसुंधरा राजे अपक्ष उमेदवार आणि बंडखोरांशी संपर्क साधण्यात व्यस्त आहेत. त्रिशंकू विधानसभा झाल्यास अपक्ष उमेदवारांचा भाव वाढणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.