Water Metro : भारतातील पहिली वॉटर मेट्रोसेवा ‘या’ शहरात सुरु… 10 बेटं जोडली जाणार…

भारतातील पहिली वॉटर मेट्रो कोची येथे सुरू करण्यात आली आहे. हवाई किंवा रस्ते वाहतुकीची सुविधा नसलेल्या अशा ठिकाणी जाणार्या लोकांना ही वॉटर मेट्रो अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकताच या वॉटर मेट्रोचा व्हिडिओदेखील व्हायरल करण्यात आला आहे. यात काही प्रवासी प्रवास करताना दिसत आहेत.

Water Metro : भारतातील पहिली वॉटर मेट्रोसेवा ‘या’ शहरात सुरु... 10 बेटं जोडली जाणार...
Water Metro
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 1:14 PM

मुंबई : महानगरामध्ये मेट्रोच्या सेवेमुळे उपनगरे एकमेकांना जोडली गेली आहेत. त्यामुळे प्रवाशांची सोय झालेली बघायला मिळत असते. परंतु असेही काही ठिकाणं आहेत, ज्यांना संपूर्णपणे पाण्याने वेढलेलं आहे. त्या ठिकाणी हवाई किंवा रस्ते वाहतुकीची (transportation) सोय नाही. अशा वेळी त्या ठिकाणी जाण्यायेण्यास समस्या निर्माण होत असतात. परंतु आता या समस्येवर तोडगा निघताना दिसत आहे. कोचीत (kochi) पहिली वॉटर मेट्रोसेवेला (first water metro) सुरुवात होत आहे. याबाबतचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. एका मोठ्या बोटीव्दारे बेटांवर प्रवासींना ने-आण करण्यासाठी तब्बल 10 बेटांना जोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली, या लेखातून ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

78 वॉटर मेट्रो कामाला

प्रसिध्द करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये वॉटर मेट्रो ट्रेन आपण पाहू शकतो. पांढऱ्या आणि निळ्या रंगाची छटा असलेली ही बोट अतिशय आकर्षक दिसत आहे. दरम्यान, यात एकूण 38 टर्मिनल असतील जे वॉटर मेट्रोद्वारे 10 बेटांना जोडतील. या बेटांना जोडण्यासाठी 78 वॉटर मेट्रो कामाला लागल्या आहेत. या वॉटर मेट्रोमध्ये मोठ्या आणि लहान अशा दोन प्रकारच्या बोटी असतील. मोठ्या बोटी 100 प्रवासी घेऊन जातील तर लहान 50 प्रवासी घेऊन जातील. पहिली बोट आधीच लाँच करण्यात आली असून ती आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो तर इतर दोन बोटींचाही लोकार्पण सोहळा आधीच पूर्ण झाला आहे.

जूनपर्यंत कामे पूर्ण होण्याची शक्यता

वॉटर मेट्रोची स्थानके पारंपारिक रेल्वे मेट्रोसारखीच दिसत आहेत. व्हिडिओमध्ये काही लोक वॉटर मेट्रो वापरत असल्याचे पाहू शकतो. वॉटर मेट्रोचे आणखी पाच टर्मिनल्सचे बांधकाम सध्या सुरू आहे. ते या वर्षीच्या जूनपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. चेरानेल्लूर, उच्च न्यायालय, बोलगट्टी, व्यापीन आणि दक्षिण चित्तूर येथील टर्मिनल सध्या बांधकामाच्या अंतिम टप्प्यात आहेत. शिवाय, एलूर, कक्कनाड आणि व्हिटिला येथे टर्मिनलचे बांधकाम पूर्ण झाले आहे. हे सर्व कामे कोची मेट्रो रेल लिमिटेड म्हणजेच केएमआरएलमार्फत सुरु आहेत. व्यापीन-बोलगट्टी-उच्च न्यायालय हा वॉटर मेट्रोसाठी कार्यान्वित झालेला पहिला मार्ग आहे. ही सर्व मेट्रो स्टेशन कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) द्वारे बांधली जात आहेत.

हे सुद्धा वाचा

मार्चमध्ये व्‍यट्टिला आणि कक्कनड टर्मिनल दरम्यान पहिल्या वॉटर मेट्रोची ट्रायल घेण्यात आली होती. ट्रायल रन दरम्यान, बोटीने 5 किमीचे अंतर 20 मिनिटांत कापले. कोचीन शिपयार्ड लिमिटेडद्वारे कोची मेट्रो रेल लिमिटेडला किमान 5 बोटी वितरित केल्यानंतर वॉटर मेट्रो सेवा पूर्णपणे कार्यान्वित होईल. सरकारने अशी परिवहन सेवा सुरू करण्याची ही पहिलीच वेळ नसून आधीही बोट सेवा होती परंतु कक्कनड जेट्टी परिसरात फीडर सेवा नसल्याने तिला प्रवासी मिळू शकले नाहीत. दरम्यान, आता 10 बेटे आणि बोटयार्डमध्ये पसरलेल्या 38 टर्मिनल्सना जोडतील. 15 मार्गांचे एकूण अंतर 76 किमी आहे. हे मार्ग व्‍यपीन, मुलावुकड, व्‍यट्टिला, कक्कनाड, एलूर, नेट्टूर, कुंबलम, वेलिंग्‍टन, बोलगट्टी आणि एडाकोची प्रदेशात राहणार्या बेटांच्‍या प्रवासी समस्या सोडवण्यास सक्षम ठरतील असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.