ते चौघे गप्पा मारत होते, अचानक ती जवळ आली आणि तिने…
मेट्रो ट्रेनमध्ये घडलेली एक घटना समोर आली आहे. चार मित्र गप्पा मारत होते. त्यांची मस्ती सुरू होती. अशावेळी एक महिला त्यांच्यासमोर आली. तिने त्यांच्यासोबत जे काही केलं ते पाहून त्या मुलांना...
हैदराबाद : कोणत्याही शहरातील महानगरांमध्ये बस, रेल्वे, मेट्रो यामध्ये महिलांसाठी राखीव जागा असतात, महिलांसाठी राखीव डब्बे असतात. मात्र, अशा ठिकाणी महिलांची गर्दी, भांडणे आणि त्यांची धक्काबुक्की हे तर नेहमीचेच झाले आहे. दिल्ली, मुंबई यासारख्या महानगरातील मेट्रोमध्ये गर्दी कशी असते हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पण, याच मेट्रोमध्ये एक अशी घटना घडली की ज्याची सर्वत्र चर्चा होतेय. हैदराबाद येथील मेट्रोमध्ये ही घटना घडली आहे. मेट्रो ट्रेनमध्ये घडलेल्या त्या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मेट्रो ट्रेनमध्ये चार मित्र बोलत असताना अचानक एक महिला त्यांच्याजवळ आली आणि…
मेट्रो ट्रेनमध्ये 4 मित्र गप्पा मारत बसले होते. त्यांची मजा सुरू होती. त्याचवेळी एक महिला त्यांच्याजवळ आली. काय झाले यावर त्यांची चर्चा झाली. त्याचे झाले असे की हे चार मित्र मेट्रो ट्रेनमध्ये एकत्र प्रवास करत होती. त्यातील एकाला खूप भूक लागली होती. पण, त्यांच्याकडे खाण्यासाठी काहीच नसल्यामुळे तो उपाशीच बसला होता. त्याला खूपच भूक लागली होती.
भुकेमुळे त्या मुलाला चक्कर येत होती. त्यावेळी एक महिला त्यांच्यासमोर आली. ‘माझ्याकडे दुपारच्या जेवणासाठी असलेला पुलाव भात आहे.’ असे सांगत त्या महिलेने आपला जेवणाचा डब्बा त्या तरुणाला दिला.
त्यावर त्या मित्रांना आश्चर्य वाटले. भुकेल्या तरुणाने त्या महिलेने डब्बा उघडला तेव्हा त्यात त्याला पुलावसोबत काही डाळिंबाचे दाणेही दिसले. त्यांना प्रचंड भूक लागली होती म्हणून त्याने तो डब्बा घेऊन आपली भूक शांत केली.
पुलाव खाऊन झाल्यावर त्यांनी टिफिन त्या महिलेला दिला. ‘महिलेकडे असलेला डबा किती महत्त्वाचा असतो हे मी माझ्या आईकडून शिकलो होतो. त्यामुळे पुलाव खाल्यावर मी रिकामी पेटी परत केली आणि तिचे आभार मानले.’ असे हा तरुण म्हणाला.
या घटनेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. यावर नेटिझन्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने सांगितले की, ‘भले त्या एकमेकींशी कितीही भांडत असल्या तरी त्यांच्याकदे दयाळू वृत्ती असते.’ हे दिसून येते.
आणखी एका युजरने म्हणतो की ‘तरुणाला खायला देणारी ती महिला किती दयाळू होती. पण, या लोकांना मेट्रोमध्ये खाणे आणि पिणे प्रतिबंधित आहे हे देखील माहित नाही का? असा प्रश्न केला आहे.