नवी दिल्ली- 100 कोटी रुपयांत राज्यसभेची खासदारकी (Rajya Sabha MP)देतो किंवा राज्यपाल करतो, असे सांगू फसणवूक करणारी टोळी गाजाआड झाली आहे. सीबीआयने (CBI) ही मोठी कारवाई करत चारपेक्षा जास्त जणांना या प्रकरणी (Four arrested)अटक केली आहे. सीबीआयची टीम गेल्या काही दिवसांपासून या टोळीवर लक्ष ठेवून होती. पैशांचा व्यवहार होण्याच्या काही क्षणांपूर्वी सीबीआयने या आरोपींना अटक केली आहे. आता या टोळीची चौकशी करण्यात येते आहे. त्यांच्या इतर साथईदारांचीही माहिती आता सीबीआयच्या टीमला मिळते आहे. चारपेक्षा जास्त जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून, अजून काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. सध्यातरी 100 कोटी रुपयांत हा सगळा व्यवहार ठरल्याचे समोर आले आहे.
CBI busted a racket promising high profile people a Rajyasabha seat at ₹100Cr.
हे सुद्धा वाचाKamalakar, Arora, Boora, Khan & Naik are from different parts of India & follow different faith, presented a great examples how all con minded work together ditching the social boundaries.?
— The Hawk Eye (@thehawkeyex) July 25, 2022
सीबीआय अधिकारी गेल्या काही काळापासून या आरोपींचे फोन इंटरसेप्टरच्या माध्यमातून ऐकत होते. गेल्या अनेक दिवसांपासून या आरोपींवर त्यांची नजर होती. हा व्यवहार जेव्हा अखेरच्या टप्प्यात होता त्याचवेळी सीबीआयने सापळा रचून या चौघांना अटक केली आहे.
सीबीआयने या प्रकरणात चौघा आरोपींची ओळख पटवलेली आहे. यातील एक जण महाराष्ट्रातील आहे, त्याचे नाव कमलाकर बांदगर असे आहे. दुसरा आरोपी कर्नाटकातील आहे, त्याचे नाव रवींद्र विठ्ठल नाईक असे आहे. तर दिल्लीतील महेंद्र पाल अरोरा आणि अभिषेक बुरा हे सगळेजण या व्यवहारात सामील असल्याचे समोर आले आहे.
नुकताच राज्यातही असाच एक प्रकार समोर आला होता अशी माहिती आहे. एका भाजपाच्या आमदाराकडे 100 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्याबदल्यात एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देण्याची ऑफर देण्यात आली होती. या प्रकरणात आमदाराने केलेल्या तक्रारीनंतर क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी खंडणी वसुलीच्या प्रकरणात चार जणांना अटक केली होती. या आरोपींनी तीन ते चार आमदारांसमोर ही मागणी ठेवली होती. हे चारही आरोपी राज्यातील रहिवासी होते. हातकणंगलेचा रहिवासी रियाज शेख, ठाण्यातील योगेश कुलकर्णी, मुंबईच्या नागपाड्यातील सागर संगवई आणि जफर रशिद उस्मानी अशी या चार आरोपींची नावे होती.