Highest land price : जमिनीला सोन्याचा भाव, हैदरबादच्या इतिहासातील हीच सर्वात हॉट प्रॉपर्टी

Highest land price : देशात जमिनीला सोन्याचे दिवस आले आहेत. पण हैदराबाद येथील या जमिनीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. शहराच्या इतिहासात ही प्रॉपर्टी सर्वात हॉट ठरली आहे. तिने मोठा महसूल मिळवून दिला आहे.

Highest land price : जमिनीला सोन्याचा भाव, हैदरबादच्या इतिहासातील हीच सर्वात हॉट प्रॉपर्टी
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 2:26 PM

नवी दिल्ली | 05 ऑगस्ट 2023 : देशातील अनेक शहरातच काय गाव खेड्यात पण जमिनीला सोन्याचे दाम मिळत आहे. जमिनीच्या किंमती गेल्या 10-15 वर्षांत झपाट्याने वाढल्या आहेत. पण हैदराबाद येथील या जमिनीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. शहराच्या इतिहासात ही प्रॉपर्टी सर्वात हॉट (Hyderabad Hot Property) ठरली आहे. तिने प्रशासनाला मोठा महसूल मिळवून दिला आहे. या शहरातील ही सर्वात महागडी जमीन ठरली आहे. शहर प्रशासनाला पण ई-लिलावात (E-Auction) इतका महसूल गाठीशी येईल, असे वाटले नव्हते. पण त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त भाव मिळाला. तेलंगाणा राज्यातील हा सर्वात महागडा सौदा ठरला आहे. मुंबई, दिल्लीतील महागड्या जागेइतका परतावा हैदाराबाद मिळाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. इतक्या कोटीला हा सौदा झाला.

इतकी मिळाली किंमत

हैदराबाद शहरात कोकापेट हा नावाजलेला परिसर आहे. येथील नियोपोलिस लेआऊटमधील सात प्रमुख भूखंडांचा ई-लिलाव झाला. हा 45.33 एकरचा परिसर आहे. हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी (HMDA) गुरुवारी या ई-लिलावातून मालामाल झाली. प्रशासनाला विक्रमी 3,319.6 कोटी रुपयांची कमाई करता आली.

हे सुद्धा वाचा

तेलंगाणातील सर्वात हॉट प्रॉपर्टी

तेलंगाणा राज्यात एक एकर भूखंडासाठीची ही सर्वाधिक बोली ठरली आहे. 100.75 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावण्यात आली. या सात भूखंडासाठी सरासरी 73.23 कोटी रुपये प्रति एकर भाव मिळाला. या प्लॉटची सुरुवातीची किंमत 35 कोटी रुपये प्रति एकर इतकी होती.

आनंद पोटात माईना

या सात प्लॉटसाठी गुंतवणूकदारांना सर्वाधिक बोली लावल्याने प्रशासनाने आनंदाने न्हाऊन निघाले. नगरपालिका प्रशासनाचे विशेष मुख्य सचिव, अरविंद कुमार यांनी हा एक विक्रम असल्याची प्रतिक्रिया दिली. यामुळे महसूलात मोठी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

सात प्लॉटची झाली विक्री

कोकापेटमधील या सात भूखंडाची जागा 3.60 एकर ते 9.71 एकरपर्यंत आहे. हा परिसर एकूण 45.33 एकराचा आहे. त्यांचा लिलाव करण्यात आला. या भूखंडाचे नियोजीत किंमत मूल्य 1,586.50 निश्चित करण्यात आले होते. पण प्रशासनाला या विक्रीतून 3,319.60 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. 100.75 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावण्यात आली. या सात भूखंडासाठी सरासरी 73.23 कोटी रुपये प्रति एकर भाव मिळाला.

कोणी लावली सर्वाधिक बोली

  1. एक एकरसाठी 100.75 कोटींची सर्वाधि बोली हॅप्पी हाईट्स नियोपोलिस, राजपुष्पा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने लावली. या फर्मने 3.6 एकरसाठी एकूण 362.7 कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवला.
  2. दुसरी बोली नवाट्रिस इन्वेस्टमेंट्स, राजपुष्पा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडची होती. ती प्रति एकर 75.50 कोटी इतकी होती. यामध्ये 6.55 एकरसाठी विक्रमी 494.53 कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवला.
  3. ब्रिगेड एंटरप्राईजेस लिमिटेडने 9.71 एकर भूखंडासाठी 660.28 कोटी रुपये खर्च केले. प्रति एकर 68 कोटी रुपयांची बोली लावली.
  4. एपीआर समूहाने 7.53 एकरसाठी 506.39 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. प्रति एकर बोली 67.25 कोटी होती.

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.