AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंघोळ करताना पाय घसरला, आयएएस अधिकारी नदीत वाहून गेला

आयएएस अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलीचा हा गोंधळ पाहून येथील  संगम तटावर अंघोळ करणाऱ्यांनी आणि आजूबाजूच्या रहीवाशांनी या घटनेची माहीती पोलीसांना दिली.

आंघोळ करताना पाय घसरला, आयएएस अधिकारी नदीत वाहून गेला
Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 12:47 PM

दिल्ली : एका आयएएस अधिकाऱ्याची फॅमिली देवप्रयाग ( Devprayag Sangam ) येथील अलकनंदा आणि भगीरथी नदीच्या संगम तटावर गंगास्नानासाठी गेले असता आयएएस अधिकाऱ्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात वाहून गेल्याची घटना काल घडली आहे. रेस्क्यू टीमने ( Rescue Team ) त्यांच्याशोधासाठी तातडीने मोहीम सुरु केली असून परंतू त्यांचा काहीही थांगपत्ता न लागल्याने शोध मोहीम सुरुच आहे. आयएएस अधिकाऱ्याची ( Ias Officer ) लेक आणि पत्नी यांच्यासमोरच ही घटना घडल्याने रडून त्यांची अवस्था बिकट झाली आहे.

हरियाणाच्या कृषि विभागाचे संयुक्त संचालक जगराज डांडी गुरुवारी आपल्या कुटुंबियांसोबत गंगादर्शनासाठी देवप्रयाग येथे आले होते. गुरुवारी ते ऋषिकेशहून देवप्रयाग येथील गंगा संगम तटावर आले होते, त्यांच्या फॅमिलीसह ते अलकनंदा आणि भागीरथी संगम तटावर स्नान करण्यासाठी पाण्यात उतरले होते. त्यावेळी ते नदीतील दगडावर पाय ठेवून उभे असताना पाण्याच्या खोलीचा त्यांना अंदाज आला नाही. पायाखालील दगड घसरून त्यांचा वाहत्या पाण्यात तोल जाऊन ते पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले. त्यांना वाहून जाताना पाहून त्यांची मुलगी आणि पत्नी यांनी जोरजोराने मदतीसाठी धावा केल्या. त्यामुळे आजूबाजूचे लोक मदतीला धावून आले, परंतू तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

एनडीआरएफची मदत घेणार 

आयएएस अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलीचा हा गोंधळ पाहून येथील  संगम तटावर अंघोळ करणाऱ्यांनी आणि आजूबाजूच्या रहीवाशांनी या घटनेची माहीती पोलीसांना दिली. त्यानंतर देवप्रयाग पोलीस आणि श्रीनगर जल पोलीस तसेच एनडीआरएफची संयुक्त पथकाने शोधकार्य सुरु केले. परंतू सायंकाळी उशीरापर्यंत जगराज यांचा थांगपत्ता लागला नाही. देवप्रयाग ठाणा क्षेत्राचे प्रभारी निरीक्षक देवराज शर्मा यांनी म्हटले सांगितले की डेहराडून येथून 22 सदस्यांची टीम निघाली असून शुक्रवारी सकाळपासून पुन्हा सर्च ऑपरेशन सुरु करण्यात येणार आहे.

पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा.
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस.
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन.
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.