हिऱ्याची घड्याळ, 8 कोटींची रोख रक्कम… हा तंबाखू व्यापारी की धनकुबेर?; घबाड पाहून अधिकारीही चक्रावले

आयकर विभागाकडून मोठी कारवाई केली जातंय. आयकर विभागाकडून ही कारवाई तब्बल पाच राज्यामध्ये केली जातंय. यामुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. बंशीधर टोबॅको प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मालक के.के. मिश्रा यांच्याविरोधात आयकर विभागाकडून ही कारवाई केली जातंय.

हिऱ्याची घड्याळ, 8 कोटींची रोख रक्कम... हा तंबाखू व्यापारी की धनकुबेर?; घबाड पाहून अधिकारीही चक्रावले
Follow us
| Updated on: Mar 02, 2024 | 1:41 PM

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून आयटीची छापेमारी ही विविध राज्यांमध्ये सुरू आहे. यामुळे एक खळबळ ही व्यापाऱ्यांमध्ये बघायला मिळतंय. हेच नाही तर मोठे घबाड हे आयटीच्या हाती लागले आहे. हे घबाड पाहून आयटीचे अधिकारी देखील चक्रावल्याचे बघायला मिळतंय. पाच राज्यांमध्ये आयकर विभागाकडून ही छापेमारी सुरू आहे. या छापेमारीसाठी अधिकाऱ्यांच्या 15-20 टीम या तयार करण्यात आल्यात. एका तंबाखू व्यापाऱ्याच्या विरोधात ही कारवाई सुरू आहे. कोट्यवधी किंमत असलेल्या लग्झरी गाड्या आणि 8 कोटींची रक्कम सापडलीये.

बंशीधर टोबॅको प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मालक के.के. मिश्रा यांच्या विरोधात ही कारवाई सुरू आहे. मात्र, चाैकशीला सामोरे जाण्यासाठी के.के. मिश्रा यांच्याकडून तब्येतीचे कारण दिले जात आहे. के.के. मिश्रा यांच्या दिल्लीतील घरातून मोठे घबाड हे अधिकाऱ्यांना मिळाले आहे. हेच नाही तर के.के. मिश्रा यांच्याकडे हिऱ्याचे काही घड्याळे देखील अधिकाऱ्यांना मिळाली आहेत.

घड्याळाची किंमत ही 2.5 कोटी रुपये असून डायमंड स्टेडिडची घड्याळ आहे. अशा एकून पाच घड्याळी या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्या आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी के.के. मिश्रा यांना विचारले की, कंपनीचा टर्नओवर हा 20 ते 25 कोटी आहे तर मग 60 ते 70 कोटींच्या गाड्या घरी काय करत आहेत.

असे सांगितले जाते की, बंशीधर टोबॅको प्रायव्हेट लिमिटेडने एका मोठ्या पानमसाला कंपनीला त्यांचा माल हा कोणत्याही कागदपत्रांशिवाय विकला. हेच नाही तर आता आयकर विभागाचे अधिकारी हे आता त्या संबंधित पानमसाला कंपनीच्या विरोधात देखील कारवाई करण्याच्या तयारीत आहेत, त्यांनी कोणत्याही कागदपत्रांशिवाय हा माल खरेदी केला.

अजूनही या प्रकरणात आयकर विभागाकडून कारवाई ही केली जातंय. 3 कोटीचे दागिने देखील जप्त करण्यात आलीत. दिल्ली, गुजरात आणि आंध्रप्रदेशमध्ये ही कारवाई सुरू आहे. बंशीधर टोबॅको प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मालक के.के. मिश्रा यांच्या घरी 50 कोटींहून अधिक किंमतीच्या कार मिळाल्या आहेत. आता या प्रकरणात मोठी कारवाई ही केली जाऊ शकते. या कारवाईनंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.