तुम्ही ज्या जागेवर रेघ ओढाल ती जमीन तुम्हाला, मोदींना जेव्हा मंदिरासाठी यूएईच्या प्रमुखांनी दिला शब्द

UAE temple : अबुधाबीमध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून या मदिराचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी जेव्हा या मंदिरासाठी जागा मागितली होती तेव्हा यूएईच्या अध्यक्षांनी कोणतीही वाट न पाहता लगेचच या जागेसाठी जमीन देण्याची घोषणा केली.

तुम्ही ज्या जागेवर रेघ ओढाल ती जमीन तुम्हाला, मोदींना जेव्हा मंदिरासाठी यूएईच्या प्रमुखांनी दिला शब्द
Follow us
| Updated on: Feb 14, 2024 | 7:21 PM

Modi in UAE : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी अबुधाबीमध्ये बांधलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. खुद्द पंतप्रधान मोदींच्या विनंतीवरून या भव्य मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. अहलान मोदी कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी स्वतः बोचासन निवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने (BAPS) बांधलेल्या या भव्य मंदिराची कहाणी सांगितली. पीएम मोदींनी सांगितले की, 2015 मध्ये त्यांनी यूएईचे अध्यक्ष आणि त्यांचे ‘भाऊ’ नाह्यान यांना या मंदिरासाठी जमीन देण्याची विनंती केली होती. यावर यूएईच्या अध्यक्षांनी क्षणाचाही वेळ न दवडता लगेच हो म्हटलं. ज्यावर तुम्ही रेघ ओढाल ती जमीन मी तुला देईन असे ते म्हणाले होते. आता या इस्लामिक देशात मंदिर बांधण्याची चर्चा जगभर होत आहे.

पीएम मोदींनी सांगितला किस्सा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर भारतीय समुदाय कार्यक्रम ‘अहलान मोदी’ या कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले की, गेल्या दहा वर्षांतील माझी ही सातवी UAE भेट आहे. आजही UAE चे अध्यक्ष नाह्यान मला विमानतळावर स्वागत करायला आले. त्याची कळकळ तशीच होती, जवळीकही तशीच होती. हेच त्यांना खास बनवते. ते म्हणाले, ‘मला आनंद आहे की आम्हालाही त्यांचे भारतात चार वेळा स्वागत करण्याची संधी मिळाली. काही दिवसांपूर्वीच ते गुजरातमध्ये आले होते. त्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लाखो लोक जमले होते. UAE मध्ये ज्या प्रकारे ते तुमची सर्वांची काळजी घेतात, ज्या प्रकारे तो तुमच्या आवडींची काळजी घेतात. असे क्वचितच पाहायला मिळते. त्यामुळे ते सर्व लोक त्यांचे आभार मानण्यासाठी घराबाहेर पडले.”

सुमारे 27 एकर जागेवर बांधले हिंदू मंदिर

पीएम मोदी पुढे म्हणाले की, 2015 मध्ये मी तुम्हा सर्वांच्या वतीने त्यांना अबुधाबीमध्ये एका मंदिराचा प्रस्ताव दिला होता. अध्यक्ष नाह्यान यांनी लगेच होकार दिला. ते म्हणाले की अबुधाबीमधील भव्य दिव्य मंदिराच्या उद्घाटनाची ऐतिहासिक वेळ आली आहे. पंतप्रधान मोदी बुधवारी अबुधाबीमध्ये ज्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करणार आहेत, ते वैज्ञानिक तंत्र आणि प्राचीन स्थापत्य पद्धती वापरून बांधण्यात आले आहे. दुबई-अबू धाबी शेख झायेद महामार्गावरील अल रहबाजवळ स्थित, बोचासन रहिवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) यांनी बांधलेले हे हिंदू मंदिर सुमारे 27 एकर जागेवर बांधले आहे.

300 हून अधिक हाय-टेक सेन्सर

तापमान मोजण्यासाठी आणि भूकंपाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या मंदिरात 300 हून अधिक हाय-टेक सेन्सर बसवण्यात आले आहेत. मंदिराच्या बांधकामात कोणत्याही धातूचा वापर करण्यात आलेला नाही आणि पाया भरण्यासाठी फ्लाय ॲश (कोळसा-आधारित वीज प्रकल्पातील राख) वापरण्यात आली आहे. सुमारे 700 कोटी रुपये खर्चून हे मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे भव्य मंदिर ‘शिल्प’ आणि ‘स्थापत्यशास्त्र’ मध्ये वर्णन केलेल्या प्राचीन बांधकाम शैलीनुसार बांधले गेले आहे. ‘शिल्प’ आणि ‘स्थपत्य शास्त्र’ हे हिंदू ग्रंथ आहेत जे मंदिराची रचना आणि बांधकाम कलेचे वर्णन करतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.