विद्यार्थी दहशतवाद्यांच्या रडारवर?, मुजाहिद्दीनमध्ये भरतीचा प्लान; NIA च्या छापेमारीतून धक्कादायक माहिती उघड

अमरावतीच्या अचलपूरमध्ये काल मध्यरात्री एनआयएने केलेल्या छापेमारीत ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांला अमरावतीला आणले आहे. या विद्यार्थ्याची अमरावतीतच एका ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्तात चौकशी करण्यात येत आहे. हा विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये अडकल्याचा एनआएला संशय आहे. त्यामुळे त्याची चौकशी करण्यात येत असून चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विद्यार्थी दहशतवाद्यांच्या रडारवर?, मुजाहिद्दीनमध्ये भरतीचा प्लान; NIA च्या छापेमारीतून धक्कादायक माहिती उघड
NIA SEARCHImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 18, 2023 | 5:47 PM

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 18 डिसेंबर 2023 : एनआयएने आज महाराष्ट्रासह देशभरात छापेमारी केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातही छापेमारी करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या छापेमारीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. दहशतवाद्यांनी विद्यार्थ्यांना टार्गेट केल्याचं उघड झालं आहे. या विद्यार्थ्यांची इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत भरती करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

एनआयएने अमरावती, पुणे, मुंबईत छापेमारी केली. या छापेमारीत आठ जणांना अटक करण्याकत आली होती. या छापेमारीत अनेक केमिकल्स, सशयास्पद कागदपत्रे, रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आयसीसच्या आणखी एका म्होरक्याला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर झारखंड, दिल्ली, कर्नाटकासह एकूण 19 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.

आयसीसला प्रमोट करत होते

या छापेमारीत मिनाझ ऊर्फ सुलेमान नावाच्या इसमाला अटक केली आहे. सुलेमान हा महाराष्ट्रातील आयसीसचा मोहरक्या आहे. अटक केलेले आरोपी आयसीसच्या संपर्कात होते. तसेच आयसीसला प्रमोट करत होते, असं एनआयएच्या तपासातून उघड झालं आहे. या छापेमारीत सल्फर, पोटॅशियम नायट्रेट, गनपावडर, चारकोल, साखर, इथेनॉल, धारधार शस्त्रे, बेहिशोबी मालमत्ता आणि संशयास्पद कागदपत्रे एनआयएच्या हाती आली आहेत. काही लॅपटॉप आणि स्मार्टफोनही एनआयएकडून जप्त करण्यात आले आहेत.

हँडलर्सच्या संपर्कात

जप्त केलेल्या केमिकल्सचा वापर करून आयईडी बॉम्ब बनवण्याचा आरोपींचा प्रयत्न होता असा आरोप आहे. सर्व आरोपी हे जिहाद, खिलाफत आणि आयसीसच्या मार्गावर होते असा एनआयएचा आरोप आहे. एनक्रिप्टेड अप्लिकेशन्सचा वापर करून आरोपी हँडलर्सच्या संपर्कात होते. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना टारगेट करून त्यांना यामध्ये सहभागी होण्यास भाग पाडत असल्याचा एनआयएचा संशय आहे. मुजाहिद्दीनमध्ये भरती करुन जिहाद करण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर होणार होता. इस्लामिक स्टेट आणि सीरियात आरोपींचे हँडलर्स असल्याचंही एनआयएने म्हटलंय. या प्रकरणी मुंबईतून अनास शेखला अटक करण्यात आली आहे. अमरावती आणि पुण्यातही अद्याप काही जणांची चौकशी सुरू आहे.

परत अमरावतीला

अमरावतीच्या अचलपूर शहरातील बियावाणी चौकात मध्यरात्री एनआयएने छापेमारी केली आहे. या प्रकरणी सायम अली सय्यद अहमद अली नावाच्या 18 वर्षाच्या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. हा मुलगा अचलपूरच्या जगदंबा कॉलेजातील विद्यार्थी आहे. या ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्याकडून लॅपटॉप आणि कागदपत्रे, मोबाईल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांला एनआयएचे पथक अमरावतीला घेऊन गेलं असून चौकशीतून सर्व प्रकार समोर येईल.

Non Stop LIVE Update
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?.
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा.
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले..
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले...
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार.
अनिल देशमुखांवर नागपुरात हल्ला, गाडीवर दगडफेक अन डोक्याला गंभीर दुखापत
अनिल देशमुखांवर नागपुरात हल्ला, गाडीवर दगडफेक अन डोक्याला गंभीर दुखापत.
बारामतीचा दादा कोण? अजित पवार की युगेंद्र? लढाई पुतण्यावरून तापली
बारामतीचा दादा कोण? अजित पवार की युगेंद्र? लढाई पुतण्यावरून तापली.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाकरे बंधू भिडले, कोणाची तोफ कोणावर धडाडली?
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाकरे बंधू भिडले, कोणाची तोफ कोणावर धडाडली?.
'थडग्यावर चादर चढवणारा, हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला जरांगे राक्षस'
'थडग्यावर चादर चढवणारा, हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला जरांगे राक्षस'.
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....