Petrol & Diesel price: मोदी सरकार पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढवणार; केंद्रात हालचालींना वेग

पेट्रोलचा दर प्रतिलीटर 3 रुपयांनी तर डिझेल प्रतिलीटर 2 रुपयांनी महाग होऊ शकते. | Petrol and diesel price

Petrol & Diesel price: मोदी सरकार पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढवणार; केंद्रात हालचालींना वेग
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 2:46 PM

नवी दिल्ली: पाच राज्यांमध्ये सुरु असलेली निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर मोदी सरकारकडून एक मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या (Diesel price) दरांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचे दर वाढल्यामुळे पेट्रोलियम कंपन्या सध्या तोटा सहन करत आहेत. त्यामुळे निवडणुका संपल्यानंतर लगेचच पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जाऊ शकतात. (Petrol and Diesel prices may increases soon)

‘बिझनेस स्टॅडर्ड’ दैनिकाच्या माहितीनुसार, पेट्रोलचा दर प्रतिलीटर 3 रुपयांनी तर डिझेल प्रतिलीटर 2 रुपयांनी महाग होऊ शकते. त्यामुळे अगोदरच लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेले व्यापारी, वाहतूकदार आणि सामान्य नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 27 फेब्रुवारीपासून कोणतीही वाढ झालेली नाही. मार्च महिन्यात उलट इंधनाच्या दरामध्ये चारवेळा कपात झाली. मात्र, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर वाढल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना इंधन दरवाढ करणे अपरिहार्य होते. मात्र, सध्या काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरु असल्याने केंद्र सरकार कोणताही धोका पत्कारायला तयार नाही. त्यामुळे किमान मतदानाचा शेवटचा टप्पा संपेपर्यंत मोदी सरकारकडून पेट्रोल-डिझेलचे दर कृत्रिमरित्या कमी ठेवले जातील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

निवडणुकांमुळे इंधन दरवाढीचा निर्णय लांबणीवर

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरी या पाच राज्यांमध्ये आता नवे सरकार येणार आहे. यापैकी चार राज्यांतील मतदानप्रक्रिया संपली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये आजचा सहावा टप्पा धरून अजून तीन टप्प्यांतील मतदानप्रक्रिया बाकी आहे. 29 एप्रिलला पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडेल. त्यानंतर मोदी सरकारकडून इंधन दरवाढीचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो.

इतर बातम्या:

Oxygen shortage: तुम्ही गयावया करा, उधार घ्या किंवा चोरी करा पण राज्याला ऑक्सिजन पुरवठा करा; हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारले

कोरोना उपायांबाबत ‘नॅशनल प्लॅन’ काय? सुप्रीम कोर्टाचा मोदी सरकारला खडा सवाल!

Covid 19: कोरोनाची दुसरी लाट थोपवायला आता डिसेंबर महिना उजाडेल; AIIMS प्रमुखांचे भाकीत

(Petrol and Diesel prices may increases soon)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.