Corona : कोरोनाचे आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेले नाही; कोरोनाच्या ताज्या परिस्थितीवर पंतप्रधान म्हणाले, लसीकरण करणे ही आमची प्राथमिकता

सुरुवातीच्या काळात संसर्ग थांबवणे हे आमचे प्राधान्य होते, ते आजही तसेच राहिले पाहिजे. टेस्ट, ट्रॅक, ट्रीट ही आमची रणनीती तितक्याच प्रभावीपणे राबवायची आहे.

Corona : कोरोनाचे आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेले नाही; कोरोनाच्या ताज्या परिस्थितीवर पंतप्रधान म्हणाले, लसीकरण करणे ही आमची प्राथमिकता
पंतप्रधान नरेंद्र मोदीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 2:35 PM

नवी दिल्ली : कोरोना (Corona)  विषाणूच्या ताज्या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, हे स्पष्ट आहे की कोरोनाचे आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. ओमिक्रॉन आणि त्याची सर्व रूपे कशी गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतात. हे आपण युरोपातील देशांमध्ये पाहू शकतो. तर वयोगटानुसार सर्व पात्र बालकांचे लवकरात लवकर लसीकरण करणे ही आमची प्राथमिकता असल्याचेही पंतप्रधान मोदी (Prime Minister Narendra Modi) म्हणाले. तसेच आपल्याला  पूर्वीप्रमाणेच शाळांमध्येही विशेष मोहीम राबवावी लागणार आहे. गेल्या 24 तासात भारतात कोरोनाचे 2,927 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 1,204 प्रकरणे एकट्या राजधानी दिल्लीतील आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरातून 2252 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे.

ही 24 वी बैठक

कोरोना विषाणूच्या ताज्या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, गेल्या दोन वर्षांतील कोरोनासंदर्भात आमची ही 24 वी बैठक आहे. कोरोनाच्या काळात केंद्र आणि राज्यांनी ज्या प्रकारे एकत्र काम केले आणि ज्यांनी देशाच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली. मी सर्व कोरोना योद्ध्यांचे कौतुक करतो. गेल्या 2 आठवड्यांपासून वाढत्या कोरोना बाधीतांच्या संख्येमुळे आपल्याला सतर्क राहावे लागेल. आरोग्याच्या पायाभूत सुविधांपासून ते ऑक्सिजन पुरवठ्यापर्यंत कोरोनाशी संबंधित प्रत्येक बाबीमध्ये आवश्यक ते उपलब्ध करून देण्याचे काम देशाने 2 वर्षात केले आहे.

12-14 वर्षांच्या मुलांसाठी लसीकरण सुरू

आपल्या देशात बऱ्याच काळानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाचे रुग्ण वाढल्याने कुटुंबीयांची चिंता वाढत आहे. काही शाळांमधून मुलांना संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. अधिकाधिक बालकांना लसीचे कवच मिळत आहे, ही समाधानाची बाब आहे. ते पुढे म्हणाले की, आज भारतातील 96% प्रौढ लोकसंख्येला लसीचा पहिला डोस मिळाला आहे आणि 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे 85% मुलांना दुसरा डोस मिळाला आहे. मार्चमध्ये, आम्ही 12-14 वर्षांच्या मुलांसाठी लसीकरण सुरू केले. आता 6-12 वयोगटातील मुलांसाठी देखील डोसची परवानगी देण्यात आली आहे.

जागतिक परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून

तर सर्व पात्र बालकांना लवकरात लवकर लसीकरण करणे हे आमचे प्राधान्य आहे. त्यासाठी पूर्वीप्रमाणे शाळांमध्येही विशेष मोहीम राबवावी लागणार आहे. याबाबत शिक्षक आणि पालकांनी जागरुक राहावे, याचीही काळजी आपण घेतली पाहिजे. ते पुढे म्हणाले की, तिसऱ्या लाटेदरम्यान, आम्ही दररोज 3 लाखांहून अधिक प्रकरणे पाहिली. आपल्या सर्व राज्यांनी त्यांना हाताळले आणि इतर सर्व सामाजिक आणि आर्थिक क्रियाकलापांना चालना दिली. आमचे शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ राष्ट्रीय आणि जागतिक परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत.

टेस्ट, ट्रॅक, ट्रीट ही आमची रणनीती

सुरुवातीच्या काळात संसर्ग थांबवणे हे आमचे प्राधान्य होते, ते आजही तसेच राहिले पाहिजे. टेस्ट, ट्रॅक, ट्रीट ही आमची रणनीती तितक्याच प्रभावीपणे राबवायची आहे. युद्धाची जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्याचा परिणाम पुरवठा साखळीवर झाला आहे. अशा वातावरणात आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. हे जागतिक संकट अनेक आव्हाने घेऊन येत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य यांच्यातील समन्वय अधिक वाढवणे अत्यावश्यक बनल्याचेही त्यांनी सांगितले.

इतर बातम्या :

Navneet Rana: संजय राऊतांना ॲट्रॉसिटी लावा, नवनीत राणा यांची थेट दिल्ली पोलिसांकडे तक्रार, पुन्हा जातीचा उल्लेख

ऑनर किलिंग नव्हे हे तर हॉरर किलिंग! घरातल्यांच्या विरोधात जाऊन Love Marriage, मुलीची गोळ्या घालून हत्या

Prashant Kishor Congress : गांधी परिवाराच्या दबदब्याला आव्हान देणारा प्रशांत किशोरांचा फॉर्म्युला काय; तो काँग्रेसने का फेटाळला?

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.