World Bank : जागतिक बँकेची कमान भारताच्या हातात? कोण आहेत बायडन यांच्या पसंतीचे अजय बंगा, काय आहे त्यांचे पुण्याशी नाते

World Bank : गोऱ्या साहेबांच्या देशाच्या पंतप्रधान पदापासून ते अनेक जागतिक कंपन्यांच्या सीईओपदी मूळ भारतीय असलेले अनेक दिग्गज आहेत. आता जागतिक बँकेची कमानही लवकरच भारतीय व्यक्तीच्या हाती येऊ शकते..

World Bank : जागतिक बँकेची कमान भारताच्या हातात? कोण आहेत बायडन यांच्या पसंतीचे अजय बंगा, काय आहे त्यांचे पुण्याशी नाते
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 7:40 PM

नवी दिल्ली : भारताच्या फेट्यात आणखी एक मानाचा तुरा खोवल्या जाणार आहे. गोऱ्या साहेबांच्या देशाचा पंतप्रधान, अमेरिकेचा उपराष्ट्रपतीपासून ते अनेक जागतिक कंपन्यांच्या सीईओपदी मूळ भारतीय असलेले अनेक दिग्गज आहेत. गूगल, मायक्रोसॉफ्ट आणि अनेक मोठ्या संस्थांच्या सर्वोच्च पदावर सध्या भारतीयांच्या डंका आहे. आता जागतिक बँकेची कमानही लवकरच भारतीय व्यक्तीच्या हाती येण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी (Joe Biden) मास्टरकार्डचे पूर्व सीईओ अजय बग्गा यांना जागतिक बँकेच्या (World Bank) प्रमुख पदासाठी नामनिर्देशीत केले आहे. 63 वर्षाचे बंगा सध्या जगातील सर्वात मोठी खासगी इक्विटी फर्म जनरल अटलांटिकचे (General Atlantic) उपाध्यक्ष आहेत. त्यांचे भारताशी कसे जवळचे नाते आहे, ते समजून येईल.

अजयपाल सिंह बंगा (Ajaypal Singh Banga) यांचे महाराष्ट्राशी, खासकरुन पुण्याशी नाते आहे. त्यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1959 रोजी पुण्यात झाला होता. त्यांचे वडील हरभजन सिंह बंगा लष्करात लेफ्टिनंट जनरल होते. त्यांचे कुटुंबिय मुळचे जालंधरचे आहे. त्यांनी सेंट स्टीफंस महाविद्यालयातून अर्थशास्त्र पदवी घेतली आहे. अहमदाबादच्या आयआयएम मधून त्यांनी एमबीए पूर्ण केले आहे.

त्यांच्या अर्थशास्त्र आणि इतर क्षेत्रातील योगदानाची दखल भारत सरकारने घेतली. 2016 मध्ये त्यांना पदमश्रीने सन्मानित करण्यात आले. फॉर्च्युन या मासिकाने 2012 मध्ये बंगा यांना ‘शक्तिशाली उद्योगपति-2012’ साठी निवडले होते. ते हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपनीचे पूर्व अध्यक्ष मानविंदर सिंह बंगा यांचे बंधू आहेत.

हे सुद्धा वाचा

एमबीएची पदवी घेतल्यानंतर त्यांनी 1981 मध्ये नेस्ले इंडियातून उमेदवारी सुरु केली. त्यावेळी ते मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून रुजू झाले होते. 13 वर्षानंतर त्याच कंपनीत ते मॅनेजर झाले. त्यानंतर त्यांनी पेप्सिकोच्या रेस्टॉरंटची जबाबदारी स्वीकारली. भारतात पिझ्झाहट आणि KFC आणण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे.

जगातिक मास्टरकार्ड या क्रेडिट कार्ड कंपनीचे ते एकेकाळी कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. 2009 मध्ये मास्टरकार्डने त्यांना सीईओ केले. त्यांच्या कार्यकाळात भारतात मास्टर कार्डचा भारतात झपाट्याने विस्तार झाला. मास्टरकार्डमध्ये सुरक्षा फीचर आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. याशिवाय त्यांना अमेरिकन रेड क्रॉस, क्रॉफ्ट फूड्स आणि डाऊ इंक या कंपन्यात मोठी जबाबदारी खाद्यांवर घेतली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जागतिक बँकेच्या अध्यक्ष पदासाठी अजय बंगा यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यांनी त्यांचे नाव पुढे केले आहे. बंगा यांच्याकडे हवामान बदलाचा चांगला अनुभव आहे. तसेच जागतिक आव्हानांची त्यांना चांगली जान असल्याने त्यांचे नाव सुचविण्यात आल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

डेव्हिड मालपास हे सध्या जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांचा कार्यकाळ संपायला अजून अवकाश आहे. पण जून पूर्वीच, त्यांचा कार्यकाळ समाप्त होण्याअगोदरच ते राजीनाम देत आहेत. मालपास यांचा कार्यकाळ एप्रिल 2024 रोजी संपत आहे. पण एक वर्षाअगोदरच ते पद सोडणार आहेत. त्यांची नियुक्ती डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. जागतिक बँकेत भारतासह 189 देश सदस्य आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.