जम्मू-काश्मीर आणि हरियाणाचा 8 ऑक्टोबर रोजी निकाल, त्याआधी भाजपचं वाढलं टेन्शन
जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या विधासभेसाठी मतदान पार पडलं आहे. मंगळवारी निकाल येणार आहेत. मात्र त्याआधी एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार दोन्ही ठिकाणी काँग्रेसचंच सरकार येताना दिसतं आहे.
जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभेचा निकाल मंगळवारी लागणार आहे. मात्र एक्झिट पोलनुसार दोन्ही ठिकाणी भाजपला झटका बसताना दिसत असून काँग्रेसचंच सरकार येणार असे एक्झिट पोलचे आकडे आहेत. सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फन्सचं सरकार येताना दिसतं आहे. 40-48 जागा काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला दाखवण्यात आल्या आहेत. तर भाजपला 27-32 जागा मिळतील अशी शक्यता आहे. मेहबूबा मुफ्तींच्या पीडीपीला 6-12 आणि इतरांना 6-11 जागा मिळतील असा सी व्होटरचा अंदाज आहे.
पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडी बहुमत दाखवण्यात आलं आहे. भाजपला23-27 जागा, काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्सला 46-50 जागांचा दावा करण्यात आला आहे. पीडीपीला 7-11 आणि इतरांना 5-6 जागा दाखवण्यात आल्या आहेत.
कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. मात्र एक्झिट पोलनुसार जम्मू काश्मीरची जनता काँग्रेस आणि फारुख अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सला पसंती आहे. इकडे हरियाणातही विधानसभेच्या 90 जागांपैकी पोलनुसार हरियाणाच्या जनतेचा कौल काँग्रेसच्याच बाजूनं आहे आणि इथून भाजप सत्ता गमावणार असं एक्झिट पोलचं मत आहे.
हरियाणाच्या एक्झिट पोलवर नजर टाकली तर, मॅट्रिजच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 18-24 जागा मिळू शकतात. काँग्रेसला 55-62 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला असून काँग्रेसचंच सरकार येणार असं भाकीत करण्यात आलं आहे.
दैनिक भास्करच्या एक्झिट पोलमध्येही काँग्रेसच्याच बाजूनं आकडे आहेत..भाजपला 15-29जागा…काँग्रेस 44-54 जागांसह बहुमत मिळताना दिसतंय. INLD आणि आघाडीला 1-5 जागा आणि इतरांना 6-9 जागांचा अंदाज आहे.
जम्मू काश्मीर आणि हरियाणात मोदी आणि राहुल गांधींनी धुवांधार प्रचार केला होता. निकाल मंगळवारी येणार आहेत..मात्र एक्झिट पोलचे आकडे काँग्रेसच्या बाजूनं असून दोन्ही ठिकाणी भाजपला झटका बसताना दिसतं आहे.
हरियाणामध्ये गेल्या १० वर्षापासून भाजपची सत्ता आहे. पण आता एक्झिट पोलनुसार राज्यात काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये देखील भाजपला बहुमत मिळताना दिसत नाहीये. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरेन्स आघाडीला येथे बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे येथेही भाजरला धक्का बसत आहे.
जम्मूमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळत आहेत. पण तरी देखील सत्तेपासून लांबच राहताना दिसत आहेत. हरियाणामध्ये देखील भाजपला मोठं नुकसान होताना दिसत आहे.