Jahangirpuri Encrochment Drive : दिल्लीतल्या अतिक्रणविरोधी मोहिमेवर वाद, डाव्या नेत्या बृंदा करात मैदानात, सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीनंतरही कारवाई

Jahangirpuri Encrochment Drive : दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये (Jahangirpuri) हनुमान जयंतीला हिंसाचार (Violence) झाला. यानंतर हाणामारीच्या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने बुलडोझर चालवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर निमलष्करी दलासह 1500 हून अधिक पोलिसांच्या मदतीने अवैध धंदे हटवण्यासाठी बुलडोझरचा वापर करण्यात आला. यादरम्यान कारवाई सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने जहांगीरपुरीतील एमसीडीच्या कारवाईला स्थगिती देत ​​यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले. मात्र त्यानंतरही […]

Jahangirpuri Encrochment Drive : दिल्लीतल्या अतिक्रणविरोधी मोहिमेवर वाद, डाव्या नेत्या बृंदा करात मैदानात, सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीनंतरही कारवाई
डाव्या नेत्या बृंदा करात Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 2:54 PM

Jahangirpuri Encrochment Drive : दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये (Jahangirpuri) हनुमान जयंतीला हिंसाचार (Violence) झाला. यानंतर हाणामारीच्या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने बुलडोझर चालवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर निमलष्करी दलासह 1500 हून अधिक पोलिसांच्या मदतीने अवैध धंदे हटवण्यासाठी बुलडोझरचा वापर करण्यात आला. यादरम्यान कारवाई सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने जहांगीरपुरीतील एमसीडीच्या कारवाईला स्थगिती देत ​​यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले. मात्र त्यानंतरही अधिकृत आदेश येईपर्यंत एमसीडीने तोडफोड सुरूच ठेवली होती. त्याविरोधात डाव्या नेत्या बृंदा करात (Brinda Karat) मैदानात उतरल्या. तसेच त्यांनी कायदा आणि संविधानावर बुलडोझर चालवण्यात आला. किमान सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आणि त्याच्या आदेशांवर तरी जहांगीरपुरीत बुलडोझर चालवायला नको होता, असे म्हटले आहे.

पोलीस बंदोबस्त तैनात

जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंतीला हिंसाचार झाला. यानंतर हाणामारीच्या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने बुलडोझरची कारवाई सुरू केली. जहांगीर पुरीतील बेकायदा बांधकाम पाडण्याची तयारी करण्यात आली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सीपीएम नेत्या बृंदा करात

तर जहांगीरपुरी हिंसाचारग्रस्त भागात स्थानिक लोक आपले सामान काढताना दिसत होते. तर आपले साहित्य काढून कारवाई होण्याआधी दुसऱ्या ठिकाणी पाठवत होते. कारण त्या लोकांना कोणतीच नोटीस देण्यात आली नव्हती. त्यामुळे हे सगळं सुरू होतं. तर ज्यावर आपला उदरनिर्वाह चालतो तेच हटविण्यात येणार असल्याने लोक न्यायालयात गेले होते. मात्र येथील मशिदीजवळील अतिक्रमण हटविण्यात आली.

त्यानंतर हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. खरं तर, जमियत उलेमा-ए-हिंदने यूपी, मध्य प्रदेशातील हिंसाचाराच्या आरोपींच्या मालमत्ता पाडल्याच्या विरोधात याचिका दाखल केली होती. त्यात आज उलेमा-ए-हिंदने जहांगीरपुरीतील बुलडोझर कारवाईचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर मांडला. त्यात आता सीपीएम नेत्या बृंदा करात यांनी उडी घेतली.

वृंदा करात आदेशासह घटनास्थळी पोहोचल्या

यादरम्यान कारवाई सुरू असताना जहांगीरपुरीतील सीपीआय (एम) नेत्या वृंदा करात यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने सकाळी 10:45 वाजता अतिक्रमणविरोधी मोहिमेला यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही, NDMC दिल्लीतील जहांगीरपुरी भागात अतिक्रमणविरोधी मोहीम सुरूच ठेवत आहे. यावेळी कायद्याची पायमल्ली करणाऱ्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या बुलडोझरला रोखण्यासाठी मी आल्याचे बृंदा करात म्हणाल्या.

जनतेला आवाहन

यावेळी बृंदा करात म्हणाल्या की, मी जहांगीरपुरीच्या जनतेला एवढेच सांगेन की, सर्वांनी एकोपा आणि शांतता राखावी. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येथे बुलडोझर थांबला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाची प्रतीक्षा करा.

पहा :

पहा :

इतर बातम्या :

Maharashtra Corona Update : घाबरण्याचं कारण नाही, राज्यातल्या कोरोना स्थितीवर आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे आश्वासक सूर, महाराष्ट्रासह पाच राज्यांना केंद्राचा अलर्ट

Jahangirpuri Encrochment Drive : दिल्लीच्या बुलडोजर कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, स्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश, उद्या सविस्तर सुनावणी

Bhopla Crime : बहिणीला प्रियकरासोबत स्कुटीवर पाहिलं, भावाच्या तळपायाची आग मस्तकात, अन् भावानं रचला भीषण कट

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.