जावयाचं डोकं फिरलं, सासू सासऱ्यांवर थेट पेट्रोल टाकून काडी लावली, काय काय घडलं?

या घटनेत जळालेल्या तिघांना नातेवाईकांनी स्थानिक पीएचसीहून जवाहरलाल नेहरू वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले जात होते, परंतु वाटेत भागलपूर कहळगाव रस्ता जाम असल्याने सासू कलावती देवी (55) यांचा मृत्यू झाला.

जावयाचं डोकं फिरलं, सासू सासऱ्यांवर थेट पेट्रोल टाकून काडी लावली, काय काय घडलं?
जावयाचं डोकं फिरलं, सासू सासऱ्यांवर थेट पेट्रोल टाकून काडी लावली
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 6:20 PM

भागलपूर : दारुच्या नशेत जावयाने सासू-सासऱ्यांवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना बिहारमधील भागलपूरमध्ये जिल्ह्यातील पीरपेंती ब्लॉकच्या एकचारी दियारा येथे उघडकीस आली आहे. एवढेच नाही तर त्याने आपल्या पाच वर्षांच्या मुलालाही आगीच्या स्वाधीन केले. जावयाने तिघांवर पेट्रोल ओतताच, पेट्रोलचा वासाने सासरे सुरेश मंडल यांना जाग आली असता नाथेफिरु जावयाने धमकी दिली की घरात कोणीही जिवंत राहणार नाही. (The son in-laws threw petrol on the in-laws and set them on fire)

पाच वर्षाच्या मुलाची प्रकृती गंभीर

या घटनेत जळालेल्या तिघांना नातेवाईकांनी स्थानिक पीएचसीहून जवाहरलाल नेहरू वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले जात होते, परंतु वाटेत भागलपूर कहळगाव रस्ता जाम असल्याने सासू कलावती देवी (55) यांचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान, सासरे सुरेश मंडल यांचाही मायागंज रुग्णालयात मृत्यू झाला, तर पाच वर्षीय आदित्यची प्रकृती गंभीर आहे. मुलाचे शरीरही मोठ्या प्रमाणात जळाल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे.

आरोपी मनोज मंडलचा पोलिसांकडून कसून शोध

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी मनोज मंडल याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी एकेरीच्या ओलनी टोला येथील रहिवासी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मनोज मंडल याला अटक करण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत. मयताची मुलगी लक्ष्मी सांगते की तिचा पती मद्यपी आहे आणि दारूच्या नशेत अनेकदा घरात मारहाण करत असे. यासंदर्भात वारंवार भांडणे होत असत, याला लक्ष्मीचे आई-वडिल विरोध करीत होते. याच कारणामुळे रागाच्या भरात त्याने ही घटना घडवली. लक्ष्मी सांगते की, तिचा पतीचे परस्त्रीशी संबंध आहेत, ज्याला तिच्या आई आणि वडिलांनी विरोध केला होता. याविषयीही त्याच्या मनात राग होता. तसेच मनोज मंडलची त्याच्या सासरच्यांच्या मालमत्तेवर नजर होती. सर्व मुद्द्यांचा तपास केल्यानंतर पोलीस मारेकऱ्याला अटक करण्यासाठी छापे टाकत आहेत.

जमुई जिल्ह्यात वृ्द्धाची गोळ्या झाडून हत्या

रात्रीच्या सुमारास एका 80 वर्षीय वृद्धाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना बिहारमधील जमुई जिल्ह्यातील सिकंदर पोलीस स्टेशन परिसरातील बिचवे गावात घडली आहे. रात्री 1 च्या सुमारास झोपलेल्या अवस्थेत वृद्धाची हत्या करण्यात आली. नंदकिशोर महतो असे मयत वृद्धाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 ते 5 सशस्त्र गुन्हेगारांचा या हत्या प्रकरणात समावेश आहे. या घटनेनंतर संपूर्ण गाव दहशतीत आहे, तर मृतांच्या कुटुंबियांची स्थिती अत्यंत वाईट आहे. 20 वर्षांपूर्वी 1991 मध्येही मृत नंदकिशोर महतो यांच्या कुटुंबातील तीन लोकांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी या कुटुंबातील दोन महिला आणि एका पुरुषाची हत्या करण्यात आली होती. या घटनेत नंद किशोर महतो यांच्या काकू, पत्नी आणि एका मुलाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, तर तीन वर्षांपूर्वी मृत नंद किशोर महतो यांच्या मुलाला आरटीआय कार्यकर्ते वाल्मिकी यादव यांच्यासह दोन लोकांच्या हत्येसाठी आरोपी बनवण्यात आले होते. (The son in-laws threw petrol on the in-laws and set them on fire)

इतर बातम्या

Video | भरधाव वेगात रेल्वे येताच महिलेने दिला जोराचा धक्का, प्रवाशाचं काय झालं ? अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या चांदवडच्या रेणुका मातेचा यात्रोत्सव रद्द

Non Stop LIVE Update
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.