Punjab murder:पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येवेळीचा थरार, 7 हल्लेखोरांनी 2 मिनिटांत झाडल्या 30 गोळ्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितला घडलेला प्रकार, हत्या नेमकी कशासाठी?

नेमका हा हल्ला झाला तरी कसा हे त्याच्यासोबत असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. त्याच्यावर २ मिनिटांत ३० गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या प्रकरणानंतर सिद्धू यांच्या कुटुंबीयांनी तीव्र शोक व्यक्त करत आप सरकारला धारेवर धरले आहे. तर यानिमित्तानं पंजाबातील राजकारणही तापलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असले तरी या हत्येनंतर पंजाबातील गँगवॉर आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Punjab murder:पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येवेळीचा थरार, 7 हल्लेखोरांनी 2 मिनिटांत झाडल्या 30 गोळ्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितला घडलेला प्रकार, हत्या नेमकी कशासाठी?
मुसेवालाला मारण्यासाठी एक कोटींची सुपारी Image Credit source: social media
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 2:21 PM

चंदीगड – पंजाबी गायक (Punjabi Singer) सिद्धू मुसेवाला (Siddhu Moosewala)याच्या दिवसाढवळ्या झालेल्या हत्येनंतर, आता पंजाबमधील वातावरण चांगलेच तापले आहे. आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी सिद्धू याची सुरक्षाव्यवस्था राज्य सरकारने कमी करण्यात आली होती. त्याच्यासोबत पूर्वी असलेले ८ ते ९ शस्त्रास्त्रधारी यांची संख्या कमी करुन ती केवळ दोनवर करण्यात आली होती. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी सिद्धू याच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला. नेमका हा हल्ला झाला (The thrill of the murder)तरी कसा हे त्याच्यासोबत असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. त्याच्यावर २ मिनिटांत ३० गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या प्रकरणानंतर सिद्धू यांच्या कुटुंबीयांनी तीव्र शोक व्यक्त करत आप सरकारला धारेवर धरले आहे. तर यानिमित्तानं पंजाबातील राजकारणही तापलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असले तरी या हत्येनंतर पंजाबातील गँगवॉर आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेमकं काय घडलं ?

गोळीबाराची घटना रविवारी संध्याकाळी ५ ते ५.३० च्या काळात झाली. केवळ दोन मिनिटांत मुसावालावर ३० गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. हल्लेखोरांच्या दोन गाड्या होत्या, बलोरो आणि आणखी एक मोठी गाी होती. मुसावाला यांच्या थारला या गाड्यांनी ओव्हरटेक केले, पहिली गोळी मागच्या टारवर झाडण्यात आली. मुसावाला गाडी सांभाळेपर्यंत या गाड्यांतून ७ तरुण बाहेर पडले. त्यानंतर दोन मिनिटे नुसता गोळीबार झाला, आणि दोनच मिनिटांत ते घटनास्थळावरुन निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गोळीबाराचा आवाज ऐकून बाहेर आलेल्या नागरिकांना हल्लेखोरांनी धमकीच्या आवाजाने घाबरवले. त्यामुळे गोळाबीरानंतरही त्याच्या मदतीसाठी कुणी आले नाही. एका अज्ञाताने त्याला मोटारसायकलवरुन हॉस्पिटलमध्ये पोहचवले. पोलीस एक तास उशिराने घटनास्थळी पोहचल्याचेही प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

लॉरेन्स गँग आणि कॅनडातील गोल्डी बराड़ने घेतली जबाबदारी

सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा कट तिहार जेलमध्ये रचण्यात आल्याची माहिती आहे. कुख्यात गँगस्चटर लॉरेन्स इथे कैद आहे, त्याने कॅनडातील गोल्डी बराडच्या मदतीने हा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. यात पंजाबी सिंगपर मनकीरत औलख याचा मॅनेजरही सामील असल्याची शक्यता आहे. यापूर्वीही मुसेवालाच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. या प्रकरणात आठ जणांची नावे समोर येत आहेत.

हे सुद्धा वाचा

पंजाबातील गँगवॉर भडकणार

तर आपआपसातल्या वादातून सिद्धू याच्यावर हल्ला झाल्याचा कयास पंजाब पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुसेवालाच्या हत्येनंतर आता पंजाबातील गँगवॉर भडकण्याची शक्यता आहे. या हत्येची जबाबदारी कुख्यात लॉरेन्स गँगने घेतली आहे. मोहालीत विक्की मिड्डूखेडाच्या हत्येचा बदला घेतल्याचे लॉरेन्स गँग आणि गोल्डी बराडने सांगितले आहे. तर आता गँगस्टर बंबीहा ही समोर आली आहे. मुसेवालाशी संबंध नव्हता, असे त्यांनी सांगितले आहे. तरीही त्याचे नाव आमच्याशी जोडले गेल्याने, आता या प्रकरणात बदला घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हायकोर्टाच्या न्यायाधीशांकडून प्रकरणाची चौकशी

मुसेवाला हत्याकांडाची चौकशी आता हायकोर्टाच्या न्यायाधीशांकडून करण्यात येणार आहे. मुसेवालाच्या वडिलांनी याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हे आदेश दिले आहेत. एनआयएसह सर्व तपास यंत्रणांना मदत करण्यात येईल असेही मान यांनी जाहीर केले आहे.

पंजाबचे राजकारण तापले

सिद्धूने काँग्रेसच्या तिकिटावर मनसामधून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र आपच्या उमेदवाराकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. या हत्येनंतर काँग्रेस आणि पंजाबमध्ये अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राजीनामा देण्याची मागणीही करण्यात येते आहे. यावर आपचे पंजाबमधील खासदार संजय सिंह यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ज्यावेळी सिद्धूवर गोळीबार झाला तेव्हा त्यांच्यासोबत सरकारने दिलेली बुलेटप्रूफ कार नव्हती, आणि दोन शस्त्रधारी सुरक्षारक्षकही का नव्हते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. हल्ला झाला तेव्हा मुसेवाला हे खासगी गाडीतून दोन सहकाऱ्यांसह प्रवास करत होते, त्यांनी सुरक्षा का सोबत घेतली नव्हती, याचा शोध घेण्याची गरज आपच्या संजय सिंह यांनी सांगितली आहे. सिद्धू याच्या मृत्यूमागे त्याचे काही नीकटवर्तीय असण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.