AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्टेशन जवळ आल्याचे रेल्वे कॉल करून प्रवाशांना कळविणार, रेल्वेच्या या सुविधेने गाढ झोपणाऱ्या प्रवाशांना दिलासा

रेल्वेची ही नविन डेस्टीनेशन अलर्ट अलार्म सर्व्हीस सुविधा सुरू झाल्याने प्रवाशांना रात्री निर्धास्त झोपता येणार आहे.

स्टेशन जवळ आल्याचे रेल्वे कॉल करून प्रवाशांना कळविणार, रेल्वेच्या या सुविधेने गाढ झोपणाऱ्या प्रवाशांना दिलासा
RAILWAY-ALARMImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 7:19 PM

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासात आता बिनधास्त झोपता येणार आहे. कारण रेल्वेच्या ( IRCTC ) आयआरसीटीसीने रेल्वे प्रवाशांसाठी नविन ( destination alert wake up alarm ) अलार्म योजना आणली आहे. त्यामुळे प्रवाशांना ( PASSENGER ) त्याचे स्ठानक आले की रेल्वेकडून मोबाईल फोनवर कॉलद्वारे अलर्ट मिळणार आहे. त्या रात्रीच्या प्रवासात गाढ झोपणाऱ्या प्रवाशांना बिनधास्त झोपता येणार आहे. या फोन कॉल अलर्ट सेवेचा विशेषत: रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खूपच फायदा होणार आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी सरकते जिने, लिफ्ट, वाय-फाय आदी सुविधा दिल्या जात असून आता रेल्वेने नविन सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे प्रवासी ट्रेनमध्ये बिनधास्त झोपू शकणार आहेत. त्यासाठी रेल्वे प्रवाशांच्यासाठी नविन डेस्टीनेशन अलर्ट अलार्म सर्व्हीस सुरु केली आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. विशेषत: रात्रीचा प्रवास करताना प्रवाशांना खूपच फायदा होणार आहे.

प्रवाशाला 20 मिनिटाआधी उठवले जाणार…

रेल्वेची ही नविन डेस्टीनेशन अलर्ट अलार्म सर्व्हीस सुविधा सुरू झाल्याने प्रवाशांना रात्री निर्धास्त झोपता येणार आहे. झोपताना तुम्हाला ज्या स्थानकावर उतरायचे आहे तेथे वेळीच उतरता येईल. त्यामुळे प्रवाशांचा त्यामुळे फायदा होईल असे म्हटले जाते. नव्या सुविधामुळे प्रवाशांना स्थानक येण्याच्या 20  मिनिट आधी फोन कॉलद्वारे उठवले जाईल.

रेल्वेच्या वतीने सुरू केलेल्या या खास सुविधेचे नाव ‘डेस्टीनेशन अलर्ट वेकअप अलार्म’  असे नाव दिले गेले आहे. रेल्वे बोर्डाकडे यासंदर्भात तक्रारी आल्या होत्या. अनेक प्रवाशांना त्यांच्या गंतव्य स्थानकावर  उतरता न आल्याने त्यांची मोठी गैरसोय होत असते. त्यामुळे या त्रासातून सुटका करण्याासाठी ही योजना आणण्यात आली आहे. रेल्वेने ही सुविधा रेल्वेचा चौकशी साठीची हेल्पलाईन क्र.139 वर सुरू केली आहे.

यावेळी मिळणार सुविधा

या सेवेनूसार प्रवास करणारे प्रवासी आता हेल्पालाईन क्र. 139 वर अर्लटची सुविधा मागू शकणार आहेत. रात्री 11 ते सकाळी 7 वाजेदरम्यान ही सुविधा मिळणार आहे. या सेवेमुळे स्थानक येण्याच्या 20 मिनिटांपूर्वी तुम्हाला उठवले जाईल. या सुविधेसाठी प्रवाशांकडून केवळ तीन रूपये आकारले जाईल. ही सुविधा प्राप्त करताच प्रवाशांना त्यांचे गंतव्य स्थानक येण्याच्या २० मिनिटाआधी फोनवर अर्लट येऊन जागे केले जाईल.

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.