By Election Results 2022 : बंगालमध्ये पुन्हा TMC चे पारडे जड, शत्रुघ्न सिन्हा 53612 मतांनी आघाडीवर, बाबुलही ‘सुप्रीम’
By Election Results 2022 : एक लोकसभा (Lok Sabha) आणि चार विधानसभा (Vidhan Sabhas) जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल (Election results 2022) आज घोषित केले जातील. शनिवार, १६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यामध्ये बाबुल सुप्रियो यांच्यामुळे रिक्त झालेल्या बंगालच्या आसनसोल लोकसभेच्या जागेचाही समावेश आहे. याशिवाय छत्तीसगड, महाराष्ट्र आणि बिहारमधील प्रत्येकी एका […]
By Election Results 2022 : एक लोकसभा (Lok Sabha) आणि चार विधानसभा (Vidhan Sabhas) जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल (Election results 2022) आज घोषित केले जातील. शनिवार, १६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यामध्ये बाबुल सुप्रियो यांच्यामुळे रिक्त झालेल्या बंगालच्या आसनसोल लोकसभेच्या जागेचाही समावेश आहे. याशिवाय छत्तीसगड, महाराष्ट्र आणि बिहारमधील प्रत्येकी एका विधानसभेच्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीचे निकालही येतील. बाबुल सुप्रियो यांनी गेल्या वर्षी आसनसोल लोकसभा मतदारसंघातून राजीनामा दिला होता. बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी भारतीय जनता पार्टी (BJP) मधून तृणमूल काँग्रेस (TMC) मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आसनसोलच्या खासदारपदाचा राजीनामा दिला होता. त्याच वेळी, बालीगंगेचे प्रतिनिधित्व करणारे राज्यमंत्री सुब्रत मुखर्जी यांचे गेल्या वर्षी निधन झाले. या कारणांमुळे या दोन्ही जागांवर मतदान झाले. आसनसोलमधून टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा 53612 मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंतच्या मतमोजणीत शत्रुघ्न सिन्हा यांना 150342 मते मिळाली आहेत, तर भाजपच्या अग्निमित्रा पाल यांना 96730 मते मिळाली आहेत. याशिवाय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पार्थ मुखर्जी यांना 21740 मते मिळाली आहेत.
टीएमसीकडून शत्रुघ्न सिन्हा रिंगणात
तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) आणि आसनसोल दक्षिणमधून भाजपचे आमदार अग्निमित्रा पॉल आसनसोलमधून नशीब आजमावत आहेत. त्यामुळे येथे काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे. बालीगंगेमध्ये तृणमूलने सुप्रियो आणि भाजपने कीया घोष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-मार्क्सिस्ट (सीपीआय-एम) ने सायरा शाह यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही जागांवर काँग्रेसचे उमेदवारही उतरले आहेत. बंगालमध्ये दोन्ही जागांवर तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. बंगालमध्ये पुन्हा TMC चे पारडे जड, शत्रुघ्न सिन्हा 10 हजार मतांनी आघाडीवर असून बाबुल सुप्रियो बालीगंगेमध्ये 4,600 हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.
भाजपवर निवडणूक गैरव्यवहाराचा आरोप
TMC उमेदवार बाबुल सुप्रियो यांनी 12 एप्रिल रोजी झालेल्या मतदानादरम्यान भाजपवर निवडणूक गैरव्यवहाराचा आरोप केला होता.
शत्रुघ्न सिन्हा 11559 मतांनी आघाडीवर
आसनसोल पोटनिवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा 11559 मतांनी आघाडीवर TMC उमेदवार शत्रुघ्न सिन्हा 11559 मतांनी आघाडीवर आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांना 50185मते मिळाली आहेत, तर भाजपच्या अग्निमित्रा पाल यांना 38623मते मिळाली आहेत.
बाबुल सुप्रियो 4676 मतांनी आघाडीवर
बालीगंज विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत टीएमसीचे उमेदवार बाबुल सुप्रियो 4676 मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंतच्या मतमोजणीत बाबुल सुप्रियो यांना 9751 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या कमरुझमान चौधरी यांना 2186, भाजपच्या काया घोष यांना 621आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सायरा शाह हलीम यांना 5075 मते मिळाली.