फक्त एक मताने पडले होते वाजपेयी सरकार, कोण होता तो खासदार ज्याच्यावर उठली टीकेची झोड?

अटल बिहारी वाजपेयी हे तीन वेळा देशाचे पंतप्रधान झाले. पण त्यांचा कार्यकाळ हा खूपच कमी काळ राहिला, त्यापैकीच एक म्हणजे त्यांचा १३ महिन्यांचा कार्यकाळ. फक्त एका मतामुळे त्यांचं सरकार पडलं होतं. एका खासदाराने वाजपेयी सरकारच्या विरोधात मतदान केल्याने हे सरकार पडलं होतं.

फक्त एक मताने पडले होते वाजपेयी सरकार, कोण होता तो खासदार ज्याच्यावर उठली टीकेची झोड?
Follow us
| Updated on: May 18, 2024 | 5:00 PM

Ayal Bihari Vajpayee : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची तुलना भारतातील दिग्गज नेत्यांमध्ये केली जाते. ते भारतातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधानांपैकी एक आहेत. अटलबिहारी वाजपेयी हे तीन वेळा पंतप्रधान झाले. परंतु त्यांचा पहिला कार्यकाळ केवळ 13 दिवस होते. दुसरा कार्यकाळ केवळ 13 महिने टिकला. फक्त एका मताने त्यांचं सरकार पडलं होतं. त्यामुळे त्यांचा दुसरा कार्यकाळ फक्त 13 महिन्यांचा होता.

कोण होता तो खासदार

अटल बिहारी वाडपेयी यांचे सरकार पडण्यासाठी ज्या खासदारांना जबाबदार मानले जाते ते म्हणजे ओडिशाचे तत्कालीन मुख्यमंत्री गिरीधर गोमांग यांना. कारण त्यांनी वाजपेयी सरकारच्या विरोधात मतदान केले होते. लोकसभेत सरकारच्या बाजूने २६९ मते पडली होती. गिरधर गोमांग यांनी विरोधात मतदान केल्याने विरोधकांची मतांची संख्या 270 झाली. त्यामुळे फक्त एक मताने अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पडलं होतं. 1998 च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. पण भाजपला 182 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

गोमांग यांच्यावर टीकेची झोड

गिरधर गोमांग यांना तत्कालीन लोकसभा अध्यक्ष जीएमसी बालयोगी यांनी त्यांच्या विवेकबुद्धीच्या आधारे मतदान करण्याची परवानगी दिली होती. फेब्रुवारीमध्ये गोमांग हे ओडिशाचे मुख्यमंत्री बनले होते, परंतु त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिला नव्हता. मतदानाच्या दिवशी सभागृहात ते उपस्थित होते आणि त्यांनी सरकारच्या विरोधात मतदान केले. मुख्यमंत्री झाल्यानंतर ही खासदार म्हणून मतदान केल्याने गोमांग यांच्यावर बरीच टीकाही झाली होती.

जेव्हा राष्ट्रपतींनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले

1998 मध्ये भाजपने विविध पक्षांच्या पाठिंब्याने केंद्रात सरकार स्थापन केले होते. जयललिता यांचा अण्णाद्रमुक पक्षाने देखील भाजपला पाठिंबा दिला होता. पण 13 महिन्यांनंतर AIADMK ने सरकारचा पाठिंबा काढून घेतला होते. यानंतर वायपेयी यांचे सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर राष्ट्रपतींनी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते.

सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जायचे होते. सरकारने प्रयत्न सुरु केले. त्यावेळी सरकारला बहुमत मिळेल अशी अपेक्षा होती. पण जेव्हा मतदान झाले तेव्हा निकास धक्कादायक लागला. वाजपेयी सरकार केवळ एका मताच्या फरकाने बहुमत मिळवू शकले नाही. .

महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी फारुख अब्दुल्ला यांची नॅशनल कॉन्फरन्स ही केंद्रातील वाजपेयी सरकारची सहयोगी होती. त्यांनी संसदेत सरकारच्या बाजूने मतदान करण्याची घोषणा केली होती, परंतु पक्षाचे एक खासदार सैफुद्दीन सोज यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन सरकारच्या विरोधात मतदान केले. अटल सरकार पडण्यामागे हेही एक प्रमुख कारण मानले जात होते. एका मताने अटल सरकार पाडणारे गिरीधर गोमांग यांनी 2015 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.