आधी उद्धवना CM बनण्याचा आशीर्वाद दिला, आता अविमुक्तेश्वरानंद करत आहेत भाजपाची स्तूती

महायुतीला दैवी शक्तीचा आशीर्वाद मिळेल, असे आम्हाला माहिती होते आणि दैवी शक्तीमुळेच त्यांना एवढा मोठा विजय मिळाला असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.

आधी उद्धवना CM बनण्याचा आशीर्वाद दिला, आता अविमुक्तेश्वरानंद करत आहेत भाजपाची स्तूती
Swami Avimukteshwaranand
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 6:42 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत महायुतीला विक्रमी यश मिळाले आहे. परंतू या निवडणूकांआधी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्याचा आशीर्वाद देणारे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आता महायुतीला दैवी शक्तीने विजय मिळवून दिला असे म्हटले आहे. महायुतीने महाराष्ट्रात २३० जागांवर विजय मिळविला आहे.त्यात एकट्या भाजपाला १३२ जागांवर विजय मिळाला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ५७ जागांवर तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला ४१ जागांवर विजय मिळाला आहे.

अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे की काही दिवसांपूर्वी निवडणूकीचे तज्ज्ञ म्हणत होते की महायुतीची स्थिती वाईट होईल, लोकसभा निवडणूकीत तसाच निकाल लागला होता. त्यामुळे अशा परिस्थितीत आणखीनच धोका होता. त्यामुळे ही निवडणूक अटी तटीची होईल. काहीही होऊ शकते असे सांगितले जात होते, ते पुढे म्हणाले की आतापर्यंत इतिहासात असा विजय कोणत्या पक्षाचा किंवा युतीचा झालेला नाही. जो आता झालेला आहे. हे लोकांना कसे कळले का नाही.? लोकांना कळले नाही कारण दैवीशक्ती काम करीत होती असेही अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले.

दैवी शक्तीचा अनुभव

दैवी शक्ती जेव्हा काम करते. तेव्हा मनुष्य तिचे आकलन करु शकत नाही.आम्हा लोकांना आभास असल्याने तुम्ही पाहीले असेल इतिहासात पहिल्यांदाच कोणा शंकराचार्याने कुठल्या पार्टीबद्दल लोकांना सांगितले की त्यांना मतदान करा ! आशीर्वाद द्या ! हे आम्ही का सांगितले, आम्ही काय आमची मर्यादा विसरलो होतो का?. परंतू आम्ही दैवी शक्तीचा अनुभव घेत होतो. हा आशीवार्द एकनाथ शिंदे यांना मिळाला असे अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

गो मातेचा आशीर्वाद मिळाला

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्वामी म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन इतिहासात जे कोणी केले नाही असे काम केले. गो मातेला पशूंच्या यादीतून हटवून राज्य मातेचा दर्जा दिला. त्याच वेळी आम्हाला वाटले की गो मातेचा आशीर्वाद या व्यक्तीला मिळेल. जसजसा निवडणूका जवळ आल्या आम्हाला ही गोष्ट समजत गेली. आम्हाला आनंद आहे की गो मातेने आपला मुलगा एकनाथ शिंदे यांना अशा प्रकारचा आशीर्वाद दिला आहे.

वारसा आता शिष्य चालवतोय

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कामगिरीबद्दल स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले की महाराष्ट्राच्या जनतेने त्यांनाही प्रेम दिले आहे. त्यांना काही जागा दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांना ५७ जागा मिळाल्या आहेत याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाबद्दलचा विचार आजही जीवंत आहे. परंतू त्यांचा वारसा आता त्यांचा पूत्र नाही तर शिष्य चालवित आहे. उद्धव ठाकरे यांना केवळ २० जागा मिळाल्या आहेत.

पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...