G-20 : जगाने पाहिला भारताचा संगीत वारसा, गंधर्व अतोद्यम ठरले मुख्य आकर्षण
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल G20 शिखर परिषदेच्या सदस्यांसाठी डिनरचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात परदेशी पाहुण्यांना भारताच्या संगीत वारशाची झलक पाहायला मिळाली. यावेळी कलाकारांनी विविध दुर्मिळ वाद्ये वापरून कार्यक्रमात आणखीनच भर पडली.
G-20 Summit 2023 : नवी दिल्ली येथे दोन दिवस चाललेल्या G20 शिखर परिषदेचा आज समारोप झाला. G20 शिखर परिषदेत देशभरातील संगीत परंपरांचे प्रदर्शन करण्यात आले. परिषदेच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने G20 सदस्यांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य डिनरमध्ये जगाला भारताच्या वैविध्यपूर्ण संगीत वारशाची झलक पाहायला मिळाली.
‘गंधर्व अतोद्यम’ हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. हे एक अनोखे म्युझिकल फ्यूजन आहे, ज्यामध्ये संपूर्ण भारतातील वाद्य वादनांचा एक उत्कृष्ट सिम्फनी आहे, ज्यामध्ये शास्त्रीय वाद्यांच्या जोड्यासह हिंदुस्थानी, लोक आणि समकालीन संगीत सादर केले जाते.
गुजराती लोकगायिका उर्वशी राडाडिया, ज्यांनी डिनरमध्ये सादरीकरण केले, त्या म्हणाल्या की, “माझ्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय मंचावर परदेशी पाहुण्यांसमोर गुजराती लोकगायकांच्या कामगिरीचा आमच्या उद्योगालाही खूप फायदा होईल. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानू इच्छिते. संगीत हा ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. संगीत एक अशी गोष्ट आहे ज्याद्वारे आपण एकमेकांना समजून घेऊ शकतो.”
#WATCH | G20 in India | Gujarati Folk Singer Urvashi Radadiya, who performed at the gala dinner hosted by President Droupadi Murmu yesterday says “As a singer, this is a very proud moment for me to be able to present Gujarati Folk music at an international platform. I want to… pic.twitter.com/VwNeaPHzbg
— ANI (@ANI) September 10, 2023
भारताच्या संगीत वारशाची झलक
हिंदुस्थानी संगीत: राग दरबारी कांडा आणि काफी-खेलत होरी लोकसंगीत: राजस्थान – केशरिया बालम, घूमर आणि निंबुरा निंबुरा कर्नाटक संगीत: राग मोहनम – स्वागतम् कृष्ण लोकसंगीत: काश्मीर, सिक्कीम आणि मेघालय – बोमरू बोमरू हिंदुस्थानी संगीत: राग देश आणि एकला चलो रे लोकसंगीत: महाराष्ट्र – अबीर गुलाल (अभंग), रेश्मा चारे घणी (लावनी), गजर (वारकरी) कर्नाटक संगीत: राग मध्यमावती – लक्ष्मी बारम्मा लोकसंगीत: गुजरात- मोरबनी आणि रामदेव पीर हॅलो पारंपारिक आणि भक्ती संगीत: पश्चिम बंगाल – भटियाली आणि अच्युतम केशवम (भजन) लोकसंगीत: कर्नाटक – मधु मेकम कन्नई, कावेरी चिंदू आणि आड पांबे भक्ती संगीत: श्री रामचंद्र कृपालू, वैष्णव जन आणि रघुपती राघव हिंदुस्तानी, कर्नाटक आणि लोकसंगीत: राग भैरवी- दादरा, मिले सूर मेरा तुम्हारा