जगाची लोकसंख्या 8 अब्ज होणार, 1 अब्जाहून 2 अब्ज होण्यासाठी लागले होते 123 वर्ष, सध्या एका तासाला 270 बाळांचा जन्म

विशेष म्हणजे जगातील अर्धी लोकसंख्या ही तरुण आहे. पूर्ण जगात 30 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांची संख्या 50 टक्के आहे. पुढच्या 30 वर्षांत 2 अब्जांनी जगाची लोकसंख्या वाढेल. यात अफ्रिकेचे योगदान मोठे असेल असे संयुक्त राष्ट्रसंघाने सांगितलेले आहे.

जगाची लोकसंख्या 8 अब्ज होणार, 1 अब्जाहून 2 अब्ज होण्यासाठी लागले होते 123 वर्ष, सध्या एका तासाला 270 बाळांचा जन्म
जगाची लोकसंख्याहोणार 8 अब्ज Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 2:27 PM

नवी दिल्ली – जास्त काळ नाही पुढच्या वर्षी म्हणजे 2023 साली जगाची लोकसंख्या (World Population) 8 अब्ज होणार आहे. प्रत्येक तासाला 60 मिनिटे आणि एका मिनिटाला 270 मुलांचा जन्म, असा जगाच्या लोकसंख्येचा प्रवास सद्यस्थितीला सुरु आहे. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला जगाची लोकसंख्या 1 अब्ज झाली होती. मात्र त्यानंतर अवघ्या 220 वर्षांत जगाची लोकसंख्या 8 अब्जाच्या दिशेने प्रवास करते आहे. 2011 साली जगाच्या लोकसंख्येने 7 अब्ज हा आकडा गाठला होता. जागितक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने जगाची वाटचाल कुठल्या दिशेने सुरु आहे, हे यानिमित्ताने दिसते आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे टोकियो (Tokyo). या शहरात 3,7 कोटी लोक राहतात. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे भारताची राजधानी दिल्ली (Delhi), दिल्लीची लोकसंख्या आहे 2,9 कोटी. तर चीनमधील शांघाई हे शहर तिसऱ्या स्थानी आहे. शांघाईची लोकसंख्या आहे 2.6 कोटी. विशेष म्हणजे जगातील अर्धी लोकसंख्या ही तरुण आहे. पूर्ण जगात 30 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांची संख्या 50 टक्के आहे. पुढच्या 30 वर्षांत 2 अब्जांनी जगाची लोकसंख्या वाढेल. यात अफ्रिकेचे योगदान मोठे असेल असे संयुक्त राष्ट्रसंघाने सांगितलेले आहे.

जागतिक पातळीवर लोकसंख्या वाढीची पाच कारणे

18 ते 20 शतकापर्यंत अधिक जन्मदर

लोकसंख्या वाढीचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे तो सर्वाधिक जन्मशतकापासून ते 20 व्या शतकापर्यंत हा वेग खूप होता. सुमारे 250 वर्षांपूर्वी एक महिला सरासरी सहा मुलांना जन्म देत होता. ही स्थिती 150 वर्षे अशीच होती. 1950 साली ही गती थोडी मंदावली. त्यावेळी एक महिला सरासरी 5मुलांना जन्म देत होती. 1950 पासून जन्मदर झपाट्याने कमी झाला असला तरी लोकसंख्या विस्फोटाची स्थिती निर्माण झाली. विशेष करुन आशियात भारत आणि चीन या देशात लोकसंख्या वेगाने वाढली. सद्यस्थितीला जगात महिला सरकारी 2.5 मुलांना जन्म देते. 19 व्या शतकाच्या सुरुवातीला जगाची लोकसंख्या 100 कोटी झाल्यानंतर ती वेगाने वाढली. 1927 साली 200 कोटी, 1960 मध्ये 300 कोटीपर्यंत पोहचली. 2011 ते 2022 या काळात लोकसंख्या 7ते 7.9अब्जपर्यंत पोहोचली आहे.

जगण्याच्या वयवर्षांत झालेली वाढ

250 वर्षांपूर्वी माणसाचे सरासरी वय होते 28 वर्षे, ते आता 70 वर्षे झाले आहे. सध्या 30 देश असे आहेत, तिथे सरासरी वय 80 वर्ष आहे. 100 देशांत सरासरी वय 70 वर्ष आहे. आपल्या देशात हा आकडा 69.8 वर्ष आहे.

हे सुद्धा वाचा

मृत्यूदरात मोठी घट

जन्म दराच्या तुलनेत घटलेला मृत्यू दर हेही महत्त्वाचे कारण आहे. 1950 पासून जन्म दर आणि मृत्यूदरात घट होताना दिसते आहे. 1950 मध्ये सरासरी 1000 जणांपैकी 20 जणांचा मृत्यू होत असे. 2020 साली हा आकडा 8 वर पोहचला आहे. 2020 साली जन्मदर 17.96टक्के आहे, तर मृत्यूदर 7.60 टक्के आहे.

गर्भ रोखण्याबाबत महिलांत जागरुकता नाही

अनेकदा गर्भधारणा रोखण्याची माहिती महिलांना नसल्याने इच्छा नसतानाही मुलांचा जन्म होतो. हे लोकसंख्या वाढीचेचौथे कारण आहे. अशिया, लॅटिन अमेरिका आणि अफ्रिका खंडातील प्रगतीशील देशांचा विचार केल्यास, 1960 साली केवळ 9 टक्के जोपडी ही गर्भनिरोधकांचा वापर करत होते. 1990 नंतर ही परिस्थिती बदललेली आहे. 2015 च्या आकडेवारीनुसार आता 65 टक्के महिला गर्भनिरोधकांचावापर करतात.

बाल मृत्यू दरात घट

बाल मृत्यूंचे प्रमाण कमी झाल्यानेही लोकसंख्या वाढीत भर पडलेली आहे. 1990 साली 1000 मुलांपैकी 93 मुलांचा मृत्यू होत असे. आता ही परिस्थिती सुधारलेली आहे. 2020 साली 1000 मुलांपैकी केवळ 37 मुलांचाच मृत्यू होतो आहे. बाल मृत्यूंचे प्रमाण काही ठिकाणीच जास्त आहे. अफ्रिका खंडात ही संख्या आजही जास्त आहे.

थोड्याच कालावधीत लोकसंख्येत भारत एक बंनरवर

दर मिनिटाला 270 मुलांचा जन्म म्हणजे वर्षभरात 13 कोटी बाळं जन्माला येत आहेत. 2100 सालापर्यंत जगाची लोकसंख्या 11 अब्ज होईल. येत्या 3ते 4 वर्षांत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होईल. तर वर्ल्ड इकॉनिक फोरमच्या एका अहवालातील दाव्यानुसार या शतकाच्या अंतापर्यंत भारत आणि चीन या देशांच्या लोकसंख्येत मोठी घट होण्याचीही शक्यता आहे. 2100 साली भारताचीलोकसंख्या 1.09 अब्ज असेल. तर नायजेरियाची लोकसंख्या क्रमांक दोनवर असेल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.