उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 9 महत्त्वाचे मुद्दे
अयोध्या (उत्तर प्रदेश) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (24 नोव्हेंबर) संध्याकाळी शरयू नदीवर महाआरती केल्यानंतर, आज सकाळी रामलल्लाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 9 महत्त्वाचे मुद्दे मुद्दा क्र. 1 अयोध्येवासियांचे मनापासून आभार मानतो. अयोध्यायात्रेमागे कोणताही छुपा अजेंडा नाही – उद्धव ठाकरे मुद्दा क्र. 2 निवडणूक आल्यानंतरच काहीजण […]
अयोध्या (उत्तर प्रदेश) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (24 नोव्हेंबर) संध्याकाळी शरयू नदीवर महाआरती केल्यानंतर, आज सकाळी रामलल्लाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 9 महत्त्वाचे मुद्दे
मुद्दा क्र. 1
अयोध्येवासियांचे मनापासून आभार मानतो. अयोध्यायात्रेमागे कोणताही छुपा अजेंडा नाही – उद्धव ठाकरे
मुद्दा क्र. 2
निवडणूक आल्यानंतरच काहीजण रामाचं नाव घेतात. प्रचाराच्या वेळी राम राम केला जातो आणि निवडणुकीनंतर आराम केला जातो – उद्धव ठाकरे
मुद्दा क्र. 3
राम मंदिर लवकरात लवकर बनवा, हिंदूंच्या भावनांशी खेळू नका. कायदा करा, अध्यादेश काढा किंवा वाट्टेल ते करा, पण राम मंदिर बांधा – उद्धव ठाकरे
मुद्दा क्र. 4
भाजपच्या जाहीरनाम्यात असे म्हटले होते की ते मंदिर बांधण्यासाठी संवैधानिक माध्यमांच्या आत सर्व शक्यता विचारात घेतील. ४ वर्षात काय त्यांना एक पण शक्यता सापडली नाही? – उद्धव ठाकरे
मुद्दा क्र. 5
अच्छे दिन, 15 लाखांसारखंच राम मंदिर हाही भाजपचा चुनावी जुमला आहे, तसेच कोर्टाच्या हातात असेल तर राम मंदिराचं आश्वासन कशाला? – उद्धव ठाकरे
मुद्दा क्र. 6
रामाचं दर्शन घेताना वाटले, मी तुरुंगात आहे का? असं रामाला वाटेल, रामाचा वनवास संपला पाहिजे – उद्धव ठाकरे
मुद्दा क्र. 7
माझी अयोध्यायात्रा यशस्वी झाली, देशातील लोकांच्या भावना सांगायला इथवर आलो होतो – उद्धव ठाकरे – राम मंदिर बांधता येत नसेल, तर तसे स्पष्ट सांगा – उद्धव ठाकरे
मुद्दा क्र. 8
मी ऐकले होते की मुख्यमंत्री योगीजी म्हणाले होते, मंदिर होते आणि राहणारच. ही आमची भावना आहे, आमची धारणा आहे. आम्हाला दुःख या गोष्टीचे आहे की मंदिर दिसत नाही. म्हणून लवकरात लवकर मंदिराचे काम झाले पाहिजे. – उद्धव ठाकरे
मुद्दा क्र. 9
माझ्यापेक्षा उत्तर भारतीय चांगलं मराठी बोलतात, मुंबईतील उत्तर भारतीयांमध्ये भीतीचं वातावरण नाही – उद्धव ठाकरे