‘हा तर कमालीचा मानसिक गोंधळ’, प्रियंका गांधींनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा; बाबुराव आपटेंनी असा मारला टोमणा
Paresh Rawal on Priyanka Gandhi : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी एक निवडणूक रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधला. निवडणुकीच्या प्रचारात राजकीय नेत्यांपासून ते बॉलिवुड अभिनेत्यांपर्यंत सर्वांनीच प्रियंका गांधी यांच्या वक्तव्याचा अस समाचार घेतला.
Lok Sabha Election 2024 आता मध्यावर आली आहे. तिसऱ्या टप्प्याचे मतदान आज देशभरातील विविध भागात होत आहे. गांधी घराण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून हल्लाबोल केला. त्यानंतर प्रियंका गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. राजकीय मैदानातील या शाब्दिक युद्धात आता बॉलीवुडमधील अभिनेता आणि भाजप नेत परेश रावल यांनी पण उडी घेतली आहे. त्यांनी प्रियंका गांधींवर निशाणा साधला आहे.
ते तर बादशाह
गुजरातमधील बनासकांठा येथील एका निवडणूक प्रचार रॅलीत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान स्वतः बादशाह आहेत, ते स्वतः महलात राहतात आणि स्वच्छ कपडे घालतात. तरीही ते माझ्या भावाला शहजादा म्हणत असल्याचा निशाणा त्यांनी मोदींवर साधला होता. प्रियंका गांधी यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर गाजले. बॉलिवुड कलाकार परेश रावल यांनी प्रियंकांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.
प्रियंकांनी साधला पीएम मोदींवर निशाणा
“पंतप्रधान मोदी माझ्या भावाला शहजादा म्हणतात. पण तुम्हाला सांगू इच्छिते की, हा शहजादा लोकांच्या अडचणी ऐकण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत 4,000 किलोमीटरपर्यंत चालला. तुमचे बादशाह नरेंद्र मोदी हे महलात राहतात. कधी तुम्ही त्यांचा चेहरा टीव्हीवर बघितला आहे का? एकदम स्वच्छ पांढरा कुर्ता, धुळीचा एक कण नाही. एक केस इकडचा तिकडे होत नाही. ते तुमची मेहनत, शेतीला कसे समजतील?”, प्रियंका गांधी यांनी या रॅलीत मोदींवर निशाणा साधला होता.
बाबुराव आपटेंनी मारला टोमणा
प्रियंका गांधी यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं. बॉलीवुड अभिनेता आणि भाजप नेते परेश रावल यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यांनी ट्विटरवर(आताचे एक्स) प्रियंकांना टोमणा मारला. “बघा, आता मोदींच्या स्वच्छ राहण्याची पण यांना अडचण होत आहे. यांचा कमालीचा मानसिक गोंधळ उडालेला आहे.” असे ट्विट त्यांनी केले आहे.
लो ! अब मोदी जी के साफ़-सुथरे रहेने से भी दिक़्क़त है ! कमाल की दिमाग़ी गंदगी है ! https://t.co/v7nL3dOtfy
— Paresh Rawal (@SirPareshRawal) May 5, 2024
2014 मध्ये भाजपमध्ये
परेश रावल यांनी चित्रपटातून राजकीय नेत्यांच्या भूमिका वठवल्या. त्यानंतर ते राजकारणात आले. 2014 मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. 2019 मध्ये त्यांनी लोकसभेच्या रिंगणात शड्डू ठोकले. अहमदाबाद(पूर्व) त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली. ही निवडणूक त्यांनी जिंकली.