High Court : एफआयआर दाखल केल्याशिवाय पोलीस चौकशी नाही; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

फौजदारी दंड संहितेच्या तरतुदींनुसार तक्रारीची चौकशी करणार्‍या पोलिस अधिकाऱ्याच्या वतीने CrPC च्या कलम 160 अंतर्गत समन्स अथवा सूचना जारी केल्या जाऊ शकतात, परंतु असा तपास सुरू होण्यापूर्वी FIR नोंदवणे आवश्यक आहे, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.

High Court : एफआयआर दाखल केल्याशिवाय पोलीस चौकशी नाही; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल
एफआयआर दाखल केल्याशिवाय पोलीस चौकशी नाहीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 2:19 AM

नवी दिल्ली : तक्रार प्राप्त झाल्यानंतर एफआयआर (FIR) नोंदविल्याशिवाय पोलीस अधिकारी एखाद्या व्यक्तीला चौकशी (Inquiry)साठी पोलीस ठाण्यात बोलावू शकत नाही, असा महत्वपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालया (High Court)ने दिला आहे. सीआरपीसीच्या कलम 160 अंतर्गत पंजाब पोलिसांच्या सायबर सेलने जारी केलेले तीन समन्स रद्द करताना उच्च न्यायालयाने हे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रधारी सिंह यांनी यासंदर्भात निकाल दिला आहे. फौजदारी दंड संहितेच्या तरतुदींनुसार तक्रारीची चौकशी करणार्‍या पोलिस अधिकाऱ्याच्या वतीने CrPC च्या कलम 160 अंतर्गत समन्स अथवा सूचना जारी केल्या जाऊ शकतात, परंतु असा तपास सुरू होण्यापूर्वी FIR नोंदवणे आवश्यक आहे, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.

पोलीस अधिकाऱ्याने सीआरपीसीच्या तरतुदींनुसार काम करणे गरजेचे

उच्च न्यायालयाने फौजदारी दंड संहितेच्या (CrPC) कलम 160 मधील तरतुदींचा तपशीलवार हवाला दिला आहे. त्याआधारे न्यायमूर्ती सिंह यांनी निकालपत्रात म्हटले आहे की, FIR नोंदवल्याशिवाय तपास सुरू केला जाऊ शकत नाही. तपास कायदेशीर आणि वैध होण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याने सीआरपीसीच्या तरतुदींनुसार काम केले पाहिजे. इतकेच नव्हे तर, दंडाधिकाऱ्याला अहवाल न देता प्राथमिक चौकशी करून पोलीस अधिकारी त्याच्या अधिकाराबाहेर काम करू शकत नाही, असे स्पष्ट मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

पंजाब पोलिसांनी तीनदा जारी केले होते समन्स

फ्रँकफिन एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक कुलविंदर सिंग कोहली यांच्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी करीत निकाल दिला आहे. कोहली यांनी एका अर्जाच्या तपासात सायबर क्राईम, एसएएस नगर यांनी जारी केलेल्या समन्सला आव्हान दिले होते. या प्रकरणात उच्च न्यायालयाने कुलविंदर सिंग कोहली यांच्याविरुद्ध CrPC कलम 160 अंतर्गत 25 जानेवारी, 25 फेब्रुवारी आणि 9 मार्च 2022 रोजी जारी करण्यात आलेले समन्स रद्द केले आहेत. कुलविंदर सिंग यांनी मोहालीच्या एसएएस नगर येथे असलेल्या पंजाब पोलिसांच्या सायबर सेलने जारी केलेल्या समन्सला आव्हान दिले होते. याचवेळी त्यांनी समन्स रद्द करण्याची मागणी केली होती.

हे सुद्धा वाचा

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याचिकाकर्ते कुलविंदर सिंग कोहली हे दिल्लीचे रहिवासी असून व्यवसायाने वकील आहेत. त्यांच्याविरुद्धच्या तक्रारीच्या तपासासंदर्भात पंजाब पोलिसांनी त्यांना सायबर सेल पोलिस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले होते. कोहली यांच्याविरुद्ध राजबिक्रमदीप सिंग आणि त्यांचा मुलगा मुंजनप्रीत सिंग यांनी सोशल मीडियावर बाबा जगरूप सिंग यांच्या मृत्यूबाबत खोटे आरोप आणि ज्योतदीप सिंग यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल तक्रार दाखल केली होती. (There is no police investigation unless an FIR is lodged; Important High Court Decision)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.