हा लघुग्रह पृथ्वीच्या शेजारुन जाणार, टक्कर झाली तर 500 हिरोशिमा बॉम्ब एवढी ऊर्जा बाहेर पडणार
नासाच्या महा शक्तीशाली जेम्स वेब स्पेस टेलीस्कोपने (JWST) अलिकडेच कुख्यात "City-Killer" एस्ट्रॉईड '2024 वायआर 4' चे निरीक्षण केले होते. हा अंतराळातील खडक एखाद्या शहरावर आदळला अख्खे शहर बेचिराख होऊ शकते.

नासाने अवकाश निरीक्षणासाठी सोडलेल्या महाकाय जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने साल 2032 रोजी पृथ्वीच्या शेजारुन जाणाऱ्या क्षुद्रग्रह ( Asteroid ) “2024 वायआर 4” चा शोध लावला होता. हा क्षुद्रग्रह 180 फूट ( 55 मीटर ) व्यासाचा म्हणजे पिसाच्या झुकत्या मनोऱ्या एवढा आहे. हा क्षुद्रग्रह 22 डिसेंबर 2032 मध्ये पृथ्वी आणि चंद्राच्या अति जवळून जाणार आहे. या धोकादायक स्थितीमुळे पृथ्वीशी त्याची टक्कर झाली तर 400 हायड्रोजन बॉम्बचा स्फोट होईल एवढी ऊर्जा त्यातून बाहेर पडणार असून एखादे अख्खेच्या अख्खे शहरच नष्ट करण्याची त्याची ताकद आहे.
नासाच्या शक्तीशाली जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप ( JWST ) ने अलिकडेच कुख्यात “City-Killer” एस्टेरॉयड ‘2024 वायआर 4’ चे निरीक्षण केले होते. या जेम्स वेब स्पेस टेलिस्कॉपने केलेल्या अंदाजानुसार साल 2032 रोजी हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी खतरनाक जवळून जाणार आहे. या जेम्स वेब स्पेस टेलीस्कोपने केलेल्या संशोधनानुसार या लघुग्रहाच्या भीषण टक्करीतून जरी पृथ्वी वाचली तरी चंद्र संकटात सापडू शकतो.
22 डिसेंबर 2032 रोजी ‘2024 वायआर 4’ ( Asteroid ) ची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता नाकारण्यात आली असली तरी तो चंद्रावर आदळण्याची शक्यता अजूनही शून्य झालेली आहे, असे संशोधकांनी त्यांच्या प्राथमिक अहवालात लिहिले आहे.




JWST दुर्बीणीने ‘2024 वायआर 4’ चे निरीक्षण केले आहे त्यात असे आढळले की तो पूर्वीच्या अंदाजापेक्षा मोठा आणि खडक असू शकते. आता चांगली बातमी अशी आहे की तो आता पृथ्वीसाठी तितका धोकादायक नाहीए, परंतु अजूनही चंद्राशी त्याची टक्कर होण्याची शक्यता अजूनही कायम आहे.
संशोधकांनी आपला प्राथमिक रिपोर्ट लिहीलाय त्यानुसार 22 डिसेंबर 2032 रोजी ‘2024 वायआर4’ ची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता कमी आहे. परंतू पृथ्वीचा उपग्रह चंद्राशी या लघु ग्रहाची टक्कर होण्याचा शक्यता मात्र अजूनही कायम आहे.
खतरनाक अंतराळ खडकाचा अभ्यास
या क्षुद्रग्रहाचा मार्ग नेहमी पृथ्वीच्या मार्गावरुन जाणार असल्याने त्यांच्यात टक्कर होण्याची शक्यता आहे. जर टक्कर झाली तर संपूर्ण शहर बेचिराख होऊ शकते. 500 हिरोशिमा बॉम्ब एवढी ताकद निर्माण होऊ शकते. या क्षुद्रग्रह ‘2024 वायआर-4’ ची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता 3.1 टक्के होती. ती या आकाराच्या वस्तूसाठी सर्वाधिक शक्यता होती. त्यानंतर नासाने ही शक्यता आता शुन्यावर नेली आहे. या अनिश्चितेत दरम्यान ईएसएने जेडब्ल्युएसटीचा उपयोग करुन या खतरनाक अंतराळ खडकाचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.
चंद्राशी टक्कर होण्याची शक्यता किती ?
जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे खगोलसंशोधक आणि सह-लेखक एंड्रयू रिवकिन यांनी सांगितले की 22 डिसेंबर 2032 मध्ये या क्षुद्रग्रहाच्या चंद्राशी टक्कर होण्याची शक्यता सुमारे 2 टक्के अजूनही कायम आहे. जेडब्ल्यूएसटीच्या डाटामुळे हे कळाले की ‘2024 वायआर-4’ ची जर चंद्राशी टक्कर झाली तर हे संशोधकांसाठी अनोखी संधी निर्माण होणार आहे. कारण एका ज्ञात क्षुद्रग्रहाला वास्तव्यात आपल्या नजरेसमोर एका नवे विवर बनवताना पाहू शकणार आहे.