दिल्लीत मोठी इमारत दुर्घटना! निर्माणाधीन इमारत कोसळली, तिघे गाडले गेले, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Delhi Building Collapse : निर्माणाधीन इमारत कोसळली असल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी बचावकार्यासाठी रवाना झाल्या होत्या. आतापर्यंत चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तिघांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

दिल्लीत मोठी इमारत दुर्घटना! निर्माणाधीन इमारत कोसळली, तिघे गाडले गेले, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
दिल्लीत इमारत दुर्घटनाImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 10:00 AM

दिल्ली : अनंत चतुर्दशीच्या दिवशी एकीकडे संपूर्ण देशभरात गणपती विसर्जनाचा उत्साह आहे. तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत (Delhi Breaking News) एक मोठी दुर्घटना झाल्याचं वृत्त समोर आलंय. दिल्लीत एक निर्माणाधीन इमारत (Delhi Building Collapse) कोसळली आहे. दिल्लीच्या आझाद मार्केट (Azad Market) परिसरातील शीश महाल इथं या इमारतीचं काम सुरु होतं. मात्र ही इमारत कोसळून आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जणांना वाचवण्यात यश आलं आहे. काही जण या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची शंका व्यक्त केली जातेय. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.

अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दोन मजूर जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. सकाळी आठ वाजता ही दुर्घटना घडली.

शालेय विद्यार्थी गाडले गेले?

धक्कादायक बाब म्हणजे ज्या वेळी ही दुर्घटना घडली, नेमक्या त्याच वेळी काही विद्यार्थी या मार्गावरुन शाळेत जात होते. त्यामुळे काही विद्यार्थीही या इमारतीच्या ढिगाऱ्या दबले गेले असण्याची शंका, एका प्रत्यक्षदर्शीने व्यक्त केली आहे. इमारतीच्या बांधकामासाठी 15 मजूर याठिकाणी काम करत होते, अशीही माहिती समोर आलीय.

निर्माणाधीन इमारत कोसळली असल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी बचावकार्यासाठी रवाना झाल्या होत्या. आतापर्यंत चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तिघांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. रेस्क्यू टीम युद्धपातळीवर बचावकार्य करतेय. प्लॉट नंबर 754मध्ये काम सुरु असलेली ही इमारत कोसळल्यानंतर एकच खळबळ उडाली.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.