‘मिशन बंगाल’, झारखंडचे तीन माजी मुख्यमंत्री मैदानात; वाचा भाजपचा संपूर्ण प्लान

पश्चिम बंगालमधील अनेक नेते, अभिनेते, खासदार आणि आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. (Three former Jharkhand CMs to campaign for BJP in West Bengal)

'मिशन बंगाल', झारखंडचे तीन माजी मुख्यमंत्री मैदानात; वाचा भाजपचा संपूर्ण प्लान
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 8:50 AM

कोलकाता: पश्चिम बंगालमधील अनेक नेते, अभिनेते, खासदार आणि आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये संपूर्ण जोर लावण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. बंगाल सर करण्यासाठी भाजपने कोणतीही कसूर न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून झारखंडच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांनाही बंगालमध्ये प्रचार करण्यासाठी उतरवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. (Three former Jharkhand CMs to campaign for BJP in West Bengal)

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या तारखा घोषित व्हायच्या आहेत. मात्र, भाजपने त्यापूर्वीच बंगालमध्ये प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. दिल्लीपासून अन्य राज्यातील भाजपचे नेतेही बंगालचा दौरा करत आहेत. त्यामुळे भाजपने आता झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांना बंगालच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंडा हे बांगला भाषिक राज्यातूनच येतात. त्यामुळे ते आधीच बंगालमध्ये दाखल झाले आहेत. तर बाबूलाल मरांडी आणि रघुबर दास हे दोन माजी मुख्यमंत्रीही लवकरच बंगालमध्ये पोहोचणार आहेत. हो दोन्ही नेते लवकरच बंगालमध्ये प्रचार करताना दिसणार आहे. मरांडी यांनी आधीच बंगालचा दौरा करून संपूर्ण माहिती घेतलेली आहे. आता त्यांचा बंगालमधील पुढील प्रचाराचा संपूर्ण कार्यक्रम तयार होणार आहे.

झारखंड-पश्चिम बंगालच्या सीमा एकच

बंगालची अनेक गावं झारखंडच्या सीमेवर आहेत. रांची जिल्ह्याची सीमा पुरलिया जिल्ह्याला लागूनच आहे. तर वर्धमानची सीमा धनबादला लागून आहे. झारखंडच्या धनबादमध्ये निरसा आणि अन्य काही ठिकाणी भाजपची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. झारखंडचे जमशेदपूर क्षेत्रही बंगालच्या जवळच आहे. माजी मुख्यमंत्री रघूबर दास स्वत: जमशेदपूरचे आहेत.

रणनीती यशस्वी होणार?

झारखंडच्या तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांना बंगालच्या निवडणुकीच्या मैदानात उतवरण्याचा भाजपने ठरवून निर्णय घेतला आहे. मात्र, प्रचाराचा धुरळा उठल्यावरच भाजपची ही रणनीती किती यशस्वी झाली हे दिसून येईल. बंगालमध्ये सध्या प्रचंड राजकीय शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी बंगालच्या निवडणुकीसाठी बंगालमध्ये तळ ठोकला आहे. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यापासून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपर्यंत अनेक नेत्यांनी बंगालचे वारंवार दौरे केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही बंगालमध्ये येऊन गेले असून त्यांचे आणखीही दौरे होणार आहेत. त्यामुळे बंगाल कुणाच्या हाती जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Three former Jharkhand CMs to campaign for BJP in West Bengal)

संबंधित बातम्या:

Delhi Violence : लाल किल्ल्यावरील हिंसाचारात सहभागी 20 जणांचे फोटो प्रसिद्ध, दिल्ली पोलिसांकडून शोधमोहीम हाती

VIDEO: पंतप्रधान मोदींची मिमिक्री करणं पुन्हा महागात, कॉमेडियन श्याम रंगीला विरोधात तक्रार दाखल

तेव्हा तो दिवस ‘अच्छा दिन’ म्हणून जाहीर करा; प्रियांका गांधींची मोदी सरकारवर खोचक टीका

(Three former Jharkhand CMs to campaign for BJP in West Bengal)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.