Encounter : गोळ्या लागल्यानंतर ही तो लढत होता, भारताच्या शूरवीर जवानाची कहानी
Anantnag Encounter: दहशतवाद्यांसोबत चकमकीत तीन भारतीय जवान शहीद झाले आहेत. चकमकीत एक कर्नल, लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स युनिटचा एक मेजर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे एक डीएसपी शहीद झालेत.
Kashmir Encounter : हरियाणातील पानिपत येथील मेजर आशिष हे जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांसोबत लढत असताना शहीद झाले आहेत. आज पानिपत येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत. मेजर आशिष यांना शेवटचा निरोप देण्यासाठी हजारो लोकं आली आहेत. अतिरेक्यांशी लढत असताना मेजर आशिष यांनी शौर्य दाखवलं. गोळ्या लागल्यानंतर ही ते लढत होते.
निवृत्त कॅप्टन धरमवीर देशवाल यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी आशिष हे शहीद झाल्याची माहिती मिळाली. अनंतनाग हा अतिशय धोकादायक परिसर आहे, तिथे तैनात असलेले सैनिकच तिथली परिस्थिती किती धोकादायक आहे हे सांगू शकतात.
आशिष यांच्या पायाच्या वरच्या भागात गोळी लागली होती. त्यांच्यासोबत सीईओही जखमी झाले होते. पण मेजर आशिष यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्या कमांडंट अधिकाऱ्याला सुरक्षित स्थळी नेण्याचा प्रयत्न केला, मात्र जखम मोठी असल्याने त्यांनी त्याच ठिकाणी प्राणाची आहुती दिली.
आशिष भाड्याच्या घरात राहत होते. लवकरच ते त्यांच्या नवीन घरात राहायला जाणार होते. पंरतू त्याआधीच ही घटना घडली.