Jammu-Kashmir : काश्मिर खोर्‍यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलांची मोठी कारवाई

लष्कर व सीआरपीएफच्या संयुक्त पथकातील जवानांनी ही कारवाई केली. परिसरात नाकाबंदी केल्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला होता. त्याला सुरक्षा दलांनी सडेतोड उत्तर दिले. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली.

Jammu-Kashmir : काश्मिर खोर्‍यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलांची मोठी कारवाई
कुपवाडामध्ये अंमली पदार्थ आणि आयईडीसह 3 संशयितांना अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 10:52 PM

श्रीनगर : मागील काही महिन्यांपासून दहशतवाद्यांनी काश्मिर खोर्‍यात पुन्हा डोके वर काढले आहे. हे दहशतवादी (Terrorist) अधूनमधून सुरक्षा दलांना टार्गेट करीत आहेत. त्यांच्याकडून हल्ल्यांचे सत्र सुरू असताना त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी सुरक्षा दलां (Security Force)नीही विशेष मोहिम (Special Campaign) हाती घेतली आहे. आज काश्मिर खोर्‍यात दोन ठिकाणी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये तुफान धुमश्चक्री उडाली. या चकमकीत लष्कर-ए-तोएबाशी दोन दहशतवाद्यांसह तिघांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले. पुलवामा आणि श्रीनगरमध्ये या दोन चकमकी उडाल्या. सुरक्षा दलांच्या धडक कारवायांनी दहशतवाद्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. (Three terrorists killed in Kashmir Valley; Major action by security forces)

सुरक्षा दलांचे जंगल परिसरात सर्च ऑपरेशन

पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त खबर मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी आज सकाळपासूनच संपूर्ण जंगल परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले होते. यादरम्यान नैना बाटपोरा येथे पहिली चकमक झाली. यात दोन दहशतवादी मारले गेले. लष्कर व सीआरपीएफच्या संयुक्त पथकातील जवानांनी ही कारवाई केली. परिसरात नाकाबंदी केल्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला होता. त्याला सुरक्षा दलांनी सडेतोड उत्तर दिले. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांकडील दारुगोळा आणि मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत.

श्रीनगरमध्ये एकाचा खात्मा; दोघे पळून गेले

एकीकडे पुलवामा जिल्ह्यात सुरू असतानाच दुसरीकडे श्रीनगरच्या हजरतबल भागातही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात एका दहशतवाद्याला चकमकीत ठार करण्यात यश आले. यादरम्यान दोन दहशतवादी पळून गेले. त्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले आहे. जम्मू-काश्मिर पोलिस दलातील एका अधिकार्‍याने ही माहिती दिली. गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांनी काश्मिर खोर्‍यात हल्ले सुरू ठेवले आहेत. बुधवारीही उधमपूरमध्ये भीषण स्फोट झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला. याचदरम्यान श्रीनगरमधील एका गावच्या सरपंचाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. (Three terrorists killed in Kashmir Valley; Major action by security forces)

इतर बातम्या

Delhi Crime : आधी चिमुरडीवर बलात्कार केला, मग पट्ट्याने मारहाण, दिल्लीतील धक्कादायक घटना

Ratnagiri Accident : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात भीषण अपघात, एक महिन्याच्या बाळासह महिलेचा मृत्यू

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.