Rain : मराठवाड्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, उर्वरित राज्यात कसे राहणार चित्र?
राज्यात पावसाचे आगमन झाल्यापासून कोकणावर कृपादृष्टी राहिलेली आहे. आगामी काळातही या कोकणपट्ट्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, पाळघर, रायगडमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसणार आहे. तर दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस बरसणार आहे.
मुंबई : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच (Monsoon) मान्सून आपले रुपडे बदलणार असल्याचा अंदाज आहे. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही मान्सूनच्या शाखा सक्रीय होत असल्याने मंगळवारपासून (Marathwada) मराठवाड्यात तर मेघगर्जनेसह पावसाला सुरवात होणार आहे तर कोकणात अति मुसळधार पावसाचा इशारा (Meteorological Department) हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे जे जूनमध्ये घडले नाही ते या महिन्यात होईल का असा प्रश्न आहे. आतापर्यंत सबंध राज्यात समप्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पण आता या महिन्यात किमान सरासरीप्रमाणे पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार तर ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
कोकणावर वरुणाराजाची कृपादृष्टी
राज्यात पावसाचे आगमन झाल्यापासून कोकणावर कृपादृष्टी राहिलेली आहे. आगामी काळातही या कोकणपट्ट्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, पाळघर, रायगडमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसणार आहे. तर दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस बरसणार आहे. सुरवातीपासूनच या विभागात पावसाने हजेरी लावल्याने यंदा केवळ कोकणात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे. उर्वरित महाराष्ट्राला पावसाची अपेक्षा कायम आहे.
मध्य महाराष्ट्रात काय राहणार स्थिती?
जून महिन्यात मध्य महाराष्ट्रात देखील मान्सूनने आपला लहरीपणा दाखवलेला आहे. पुणे वगळता इतर जिल्ह्यामध्ये पावसाची अवकृपाच राहिलेली आहे. मात्र, 5 जुलैपासून पुण्यासह सातारा, कोल्हापूरसह घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे. त्यामुळे राज्यात तुरळक ठिकाणीच पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे कुठे दिलासा तर कुठे चिंता ही कायम होती. पण आता पावसाचा जोर तर वाढणार आहेच शिवाय सर्वत्र हजेरीही लावली जाणार असल्याचा अंदाज आहे.
मराठवाड्याला मिळणार का दिलासा ?
आतापर्यंत सर्वात कमी पाऊस मराठवाड्यात झाला आहे. या विभागातील 8 जिल्ह्यात सरासरी सोडा खरीप पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस झाला नाही. पण जुलै महिन्यात या विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेडमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. आता पावसाने हजेरी लावली तरच रखडलेल्या पेरण्या मार्गी लागतील आणि ज्या क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत तेथील पिके बहरतील. अन्यथा शेतकऱ्यांचा पैसा आणि मेहनत दोन्हीही पाण्यात अशीच स्थिती ओढावेल.