Ayodhya Time Capsule | राम मंदिराच्या दोनशे फूट खाली इतिहासाची कुपी, काय आहे ‘टाईम कॅप्सूल’ची संकल्पना?

टाईम कॅप्सूलमध्ये अयोध्या, भगवान राम आणि त्यांचे जन्मस्थान याबद्दल संदेश असेल आणि हजारो वर्षे टिकून राहण्याच्या दृष्टीने ते जतन केले जातील.

Ayodhya Time Capsule | राम मंदिराच्या दोनशे फूट खाली इतिहासाची कुपी, काय आहे 'टाईम कॅप्सूल'ची संकल्पना?
Follow us
| Updated on: Aug 04, 2020 | 5:09 PM

मुंबई : अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या कामाला लवकर वेग येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुढील आठवड्यात भूमिपूजन केलं जाणार आहे. राम मंदिर निर्माण करताना दोनशे फूट खाली ‘टाईम कॅप्सूल’ ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. (Time Capsule to be placed below Ayodhya Ram Mandir Temple)

राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सदस्याच्या म्हणण्यानुसार, भगवान श्रीराम यांच्या जन्मस्थळावरुन भविष्यातील पिढ्या कायदेशीर वादात अडकू नयेत, यासाठी हे ‘कालपत्र’ ठेवण्याची कल्पना यामागे आहे.

टाईम कॅप्सूलमध्ये अयोध्या, भगवान राम आणि त्यांचे जन्मस्थान याबद्दल संदेश असेल आणि हजारो वर्षे टिकून राहण्याच्या दृष्टीने ते जतन केले जातील.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंना निमंत्रण, मोदींचे भाषण, 200 पाहुणे, राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम ठरला

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा पुढील बुधवार अर्थात 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11:30 वाजता अयोध्येत पोहोचून भाषण करतील. या ठिकाणी 200 पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जवळपास दोन तास हा कार्यक्रम चालणार आहे.

लाल किल्ल्यातही टाईम कॅप्सूल

याआधी, 15 ऑगस्ट 1973 रोजी लाल किल्ल्यात जमिनीच्या 32 फूट खोल टाईम कॅप्सूल ठेवली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ही टाईम कॅप्सूल ठेवली होती. महत्त्वाच्या घटनांची नोंद असलेली कागदपत्रं आणि इतर वस्तू जमिनीत पुरुन ठेवल्या आहेत.

टाईम कॅप्सूल म्हणजे काय?

टाईम कॅप्सूल ही एखादी वस्तू किंवा माहितीचा ऐतिहासिक दस्तावेज मानला जातो. पुढील पिढ्यांपर्यंत एखादी महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी आणि भविष्यात पुरातत्वशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ किंवा इतिहासकारांना मदत करण्यासाठी टाईम कॅप्सूलच वापर केला जातो.

टाईम कॅप्सूल हा शब्दप्रयोग 1938 मधील असला, तरी ही संकल्पना जगभरात फार आधीपासून ज्ञात आहे. स्पेनमध्ये नोव्हेंबर 2017 मध्ये चारशे वर्ष जुनी टाईम कॅप्सूल सापडली होती. यामध्ये येशू ख्रिस्ताच्या मूर्तीसह काही कागदपत्रे ठेवण्यात आली होती. अंदाजे 1777 च्या कालखंडातील आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक घटनांबाबत यातून माहिती मिळाली होती.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

आयआयटी कानपूरच्या 50 वर्षांच्या इतिहासाची नोंदही टाईम कॅप्सूलमध्ये जमिनीखाली ठेवण्यात आली आहे. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी ही टाईम कॅप्सूल जमिनीखाली ठेवली होती. याशिवाय चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठाच्या इतिहासाचीही माहिती टाईम कॅप्सूलमध्ये ठेवण्यात आली आहे. (Time Capsule to be placed below Ayodhya Ram Mandir Temple)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.