Tina Dabi: मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या टीना डाबीच्या IAS होण्यापासून चर्चेत येण्यापर्यंतचा किस्सा

Tine Dabi IAS : एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या टीना डाबी यांच्या चर्चेत असण्याचं कारणंही खास आहे. लवकरच त्याचं दुसरं लग्न पार पडणार आहेत. त्यांचा नवा जोडीदारही आएएस अधिकारीच आहे.

Tina Dabi: मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या टीना डाबीच्या IAS होण्यापासून चर्चेत येण्यापर्यंतचा किस्सा
कसा आहे IAS होण्याचा प्रवास?Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 3:45 PM

आजवर आयएएस अधिकाऱ्यांच्या (IAS Officer) संघर्षाच्या कथा तुम्ही वाचलेल्या असतील. पण आयएएस अधिकाऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं एक नाव आहे, टीना डाबी (Tina Dabi). टीना डाबी आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या चर्चेत असण्याची कारणंही अनेक आहेत. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या टीना डाबी यांच्या चर्चेत असण्याचं कारणंही खास आहे. लवकरच त्याचं दुसरं लग्न पार पडणार आहेत. त्यांचा नवा जोडीदारही आएएस अधिकारीच आहे. यूपीएससी टॉपर (UPSC Topper) असलेल्यी टीना डाबी यांची गोष्टही फार इंटरेस्टिंग आहे. एका मुलाखतीत टीना यांनी सांगितलंय आपल्या आयएएस अधिकारी होण्याचा खास किस्सा सांगितलाय. मी यूपीएससी परीक्षा पास होईन, असं मला कधीच वाटलं नव्हतं, असं टीना डाबी यांनी म्हटलंय. 2016 साली झालेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. लवकरच आयएएस टीना डाबी यांचं प्रदीप गावंडेसोबत (Tina Dabi & Pradeep Gavande Wedding) लग्न होणार आहे. या दोघांचा साखरपुडा झाला आहे. मूळच्या महाराष्ट्रातील असलेल्या टीना 22 एप्रिलला लग्नबंधनात दुसऱ्यांदा अडकणार आहे. जयपुरात या दोघांचं लग्न पार पडणार आहे. दोघांचही पोस्टिंग राजस्थानमध्येच आहे.

अकरावीतच ध्येय ठरवलं!

टीना डाबी यांनी अकरावीत असतानाच आपल्याला आयएएस अधिकारी व्हायचं आहे, हे निश्चित केलं होतं. यूपीएससी परीक्षेची तयारी करताना त्यांना दर तिसऱ्या दिवशी एकटेपणा जाणवत होता. टीना डाबी या एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या आहेत.

यूपीएससीचा निकाल येण्याआधी त्या प्रचंड दबावात होत्या. अनेक शंका मनात येत होत्या. निकाल लागण्यासाठी पोटात गोळा आलेला. काहीच खाल्लंही नव्हतं. झोपडी उडाली. यूपीएससीचा निकाल लागणार, एवढंच फक्त डोक्यात होतं.

पण निकाल लागल्यानंतर माझं जगच बदलून गेलं. लोकं ओळखू लागली. माध्यमांनी मुलाखतींसाठी माझी दखल घेतली. अनेक फोन येत होते. अनेकांचं लक्ष माझ्याकडे वेधलं गेलं होतं, असं टीना डाबी यांनी मुलाखतीत म्हटलं होतं.

वाचायला आवडतं..

टीना डाबी यांना त्यांच्या आवडी निवडीबाबतही मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी जेन ऑस्टिन, अमर्त्य सेन, पी साईनाथ आणि आंबेडकरांचं लिखाण वाचायला आवडतं, असं त्यांनी म्हटलं होतं. आर्ची आणि अमर चित्रकथा वाचायला प्रचंड आवडायचं, असंही टीना डाबी यांनी म्हटलंय.

8 तास अभ्यास

टीना डाबी यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक कशी केली, याबाबतही त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. टीना डाबी या दिवसाचे फक्त 8 तास अभ्यास करत होत्या. यूपीएससीचा अभ्यास करताना अनेकदा त्यांना निराशेचा सामना करावा लागला. दर तिसऱ्या दिवशी त्यांना अभ्यास करताना एकटेपणा जाणवत होता. पण चांगला अभ्यास करण्यासाठी चांगली झोपही होणं गरजेचं असतं, असं टीना डाबी यांनी मुलाखतीमध्ये बोलताना म्हटलंय. मानवी मेंदूचीही एक विशिष्ट क्षमता आहे. क्षमतेपेक्षा जास्त ताण मेंदूवर देणं, योग्य नाही, असंही त्यांनी नमूद केलंय.

अनेकदा निराशा आल्यानंतर टीना डाबी यांनी स्वतःच स्वतःला प्रेरणा दिली. एवढी मेहनत केल्यानंतर आता सगळ्यावर पाणी सोडून देणं, योग्य नाही, असं मी माझ्या मनाला सातत्यानं समजावत राहिले, असं टीना यांनी म्हटलंय. अकरावीत असतानाच टीना डाबी यांनी आयएएस होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी टीना डाबी यांनी पूर्णपणे स्वतःला आपल्या ध्येयासाठी झोकून दिलं होतं. यूपीएससी करण्यासाठी स्वतःच स्वतःला शिस्त लावणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही टीना डाबी यांनी अनेकदा कानमंत्र दिलेलाय.

चर्चेत कशा काय?

सोशल मीडियात टीना डाबी या सक्रिय असतात. त्यांचं पहिलं लग्न हेदेखील एका आयएएस अधिकाऱ्याशीच झालं होतं. त्यानंतर आता टीना यांचं दुसरं लग्न जयपुरात होणार आहे. मूळचे महाराष्ट्रातील असलेल्या प्रदीप गावंडे आणि टीना डाबी यांच्या वयातील अंतरामुळेही त्यांचं लग्न चर्चेत आलं होतं.

संबंधित बातम्या :

2015 IAS Topper : ‘ हम रहे या ना रहे कल…’ IAS टीना डाबींचं Hidden Talent वायरल!

Tina Dabi : टीना डाबीचा पहिला नवरा आता काय करतोय? यूजर्स म्हणतात, एकदम हँडसम IAS !

Tina Dabi: लातूरची सुनबाई होणाऱ्या IAS टीना डाबींच्या जातीची चर्चा जरा जास्तच का होते? टीनाच त्याला ‘हवा’ देते?

IAS Tina Dabi : 28 ची नवरी, 41 चा नवरदेव, दोघात 13 वर्षाचं अंतर जास्त नाही? टीना डाबीनं त्रिसूत्री सांगितली

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.