हे भगवान…! तिरुपती मंदिराच्या प्रसाद लाडूत बीफ फॅट अन् माशांच्या तेलाचा वापर, प्रयोगशाळेतील अहवालात धक्कादायक खुलासा

tirupati mandir prasad controversy: भगवंताच्या प्रसादात लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरली जाते, असे म्हणणे अकल्पनीय आहे. व्यंकटेश्वर स्वामींवर माझी श्रद्धा आहे. नायडूसुद्धा त्यांचे भक्त असल्याचा दावा करतात. यामुळे आपण देवासमोर शपथ घेऊया.

हे भगवान...! तिरुपती मंदिराच्या प्रसाद लाडूत बीफ फॅट अन् माशांच्या तेलाचा वापर, प्रयोगशाळेतील अहवालात धक्कादायक खुलासा
tirupati mandir prasad controversy
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 10:56 AM

tirupati mandir prasad controversy: आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिर देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान आहे. कोट्यवधी भाविक मंदिरात दर्शनासाठी जात असतात. या भाविकांना प्रसाद म्हणून लाडू देण्यात येतो. त्या लाडूत बीफ फॅट आणि माशांच्या तेलाचा वापर करण्यात आला आहे. प्रयोगशाळेतील अहवालावरुन ही बाब समोर आली आहे. यामुळे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांची तेलगु देसम पार्टी (टीडीपी) आणि वायएसआर काँग्रेस पार्टीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे.

टीडीपीने सेंटर ऑफ एनालिसिस अँड लर्निंग इन लाइव्हस्टॉक अँड फूड (CALF) प्रयोगशाळेचा अहवाल जारी करत वायएसआर टीका केली आहे. वायएसआर पार्टीच्या सरकारच्या काळात तिरुपती मंदिरात प्रसाद अन् लाड्डूमध्ये वापरण्यात आलेल्या तुपात पशूंची चरबी आणि माशांचे तेल मिळाले, असल्याचा आरोप केला आहे. वायएसआर काँग्रेसने चंद्रबाबू नायडू स्वत:च्या स्वार्थासाठी असे आरोप करत असल्याची टीका केली आहे.

काय आहे चंद्रबाबू नायडूंचा आरोप

सीएएलएफ प्रयोगशाळेच्या अहवालात तुपात माशांचे तेल आणि बीफ टॅलोचे घटक मिळाले आहे. त्यात काही प्रमाणात लार्डसुद्धा आहे. लार्ड डुकरांचा फॅटी टिश्यूपासून काढण्यात येते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर मोठा आरोप केला होता. तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याचा हा धक्कादायक आरोप होता. नायडू यांनी दावा केला की, गेल्या ५ वर्षांत वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाचे पावित्र्य कलंकित केले आहे. त्यांनी ‘अन्नदानम’ म्हणजे मोफत जेवणच्या गुणवत्तेशी तडजोड केली. तिरुमालाच्या पवित्र लाडूंमध्येही तुपामध्ये प्राण्यांची चरबी वापरली.

हे सुद्धा वाचा

आपण देवांसमोर शपथ घेऊ या- सुब्बा रेड्डी

वायएसआरचे ज्येष्ठ नेते वाय.व्ही.सुब्बा रेड्डी म्हणाले की, भगवंताच्या प्रसादात लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरली जाते, असे म्हणणे अकल्पनीय आहे. व्यंकटेश्वर स्वामींवर माझी श्रद्धा आहे. नायडूसुद्धा त्यांचे भक्त असल्याचा दावा करतात. यामुळे आपण देवासमोर शपथ घेऊया. नायडू यांचे आरोप राजकीय फायद्यासाठी आहे. देवच नायडू आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करेल.

शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.