लुईजिन्हो फलेरोंनी काँग्रेस सोडली TMC मध्ये आले, ममता बॅनर्जीकडून थेट राज्यसभेवर वर्णी

लुईजिन्हो फलेरो यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना थेट राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे.

लुईजिन्हो फलेरोंनी काँग्रेस सोडली TMC मध्ये आले, ममता बॅनर्जीकडून थेट राज्यसभेवर वर्णी
लुईजिन्हो फलेरो- ममता बॅनर्जी
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 6:46 PM

नवी दिल्ली: गोव्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लुईजिन्हो फलेरो (Luizinho Faleiro) यांनी पक्षाचा राजीनामा देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. लुईजिन्हो फलेरो यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना थेट राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे. अर्पिता घोष यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर लुईजिन्हो फलेरो यांना संधी देण्यात आलीय.

सप्टेंबरमध्ये टीमसीत नोव्हेंबरमध्ये राज्यसभेत संधी

माजी मुख्यमंत्री लुईजिन्हो फलेरो यांनी सप्टेंबर महिन्यात काँग्रेस सोडली होती. लुईजिन्हो फलेरो यांच्या रुपात तृणमूल काँग्रेसला मोठा चेहरा मिळाला होता. लुईजिन्हो फलेरो यांना नोव्हेंबरमध्ये राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे.

लुईजिन्हो फलेरो यांचा टीएमसीला दुहेरी फायदा

लुईजिन्हो गोव्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. तर, त्यांनी त्रिपुराचे काँग्रेस प्रभारी म्हणून देखील काम केलेलं आहे. त्यामुळं टीमएसीसाठी लुईजिन्हो फलेरो गोवा आणि त्रिपुरामध्ये फायदेशीर ठरणार आहेत. फलेरो यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे वर्णन ‘स्ट्रीट फाइटर’ असे केले होते.

माझं रक्त तरुण

लुईजिन्हो फलेरो म्हणाले, ‘आपण हे दुःख संपवू आणि गोव्यात एक नवी पहाट आणू. मी म्हातारा आहे पण माझे रक्त तरुण आहे. ‘नावेलीम विधानसभेतील लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि भविष्यातील वाटचालीत नावेलीममधील जनेतेनं समर्थन द्यावं, अशी अपेक्षा लुईजिन्हो फलेरो यांनी केली होती.

गोवा विधानसभा निवडणूक टीएमसी लढवणार

तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी त्यांचा पक्ष गोव्यातील विधानसभा निवडणुकीत आपला उमेदवार उभा करेल, असं म्हटलं होतं. पक्ष लवकरच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करेल, असंही ते म्हणाले होते. ममता बॅनर्जी यांनी गोव्याचा दौरा देखील केला होता.

इतर बातम्या:

फडणवीसांना फक्त उद्धव ठाकरेंचीच नाही तर ममतांचीही टक्कर, गोव्यात काँग्रेसचं मोठं नुकसान, माजी मुख्यमंत्र्यानं पक्ष सोडला

Pradnya Satav : विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड

TMC leader Luizinho Faleiro has been duly elected RajyaSabha member on the seat Arpita Ghosh

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.