मुंबईः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी 30 नोव्हेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार असल्याची घोषणा केली आहे. सध्या मानता बॅनर्जी 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी हा दौरा 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आखली होता. मुंबईत त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. 1 डिसेंबरपर्यंत त्या मुंबईत असतील.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी पक्षाच्या विस्तारात व्यस्त आहेत. तेच, काँग्रेससोबतचे त्यांचे संबंध बिघडल्याचे चिन्ह आहेत. बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यात अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे. तर काहींनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेणार हे अपेक्षीत होतं, मात्र सोनिया गांधींच्या भेटीबद्दल विचाचल्या ममता बॅनर्जी भडकल्या.
I will meet Maharashtra CM Uddhav Thackeray and Sharad Pawar Ji during my visit to Mumbai on 30th Nov-1st Dec: West Bengal CM Mamata Banerjee
— ANI (@ANI) November 24, 2021
गेल्या दिल्ली दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती, मात्र या दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली नाही. त्या सध्या पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूप व्यस्त असल्यामुळे त्यांनी भेटीची वेळही मागितली नाही, असं ममता म्हणाल्या.
बंगाल ग्लोबल बिझनेस समिटसाठी 30 नोव्हेंबरला मुंबईत येणार असल्याचं ममता बॅनर्जींनी सांगितलं. त्या 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत मुंबईत असतील. मुंबईत त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यासोबत, त्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. मुंबई भेट ही बिझनेस समिटसाठी असल्याचं त्या म्हणाल्या असल्या तरी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीत राजकीय चर्चा होणार हे नक्की. संजय राऊत यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसेनेच्या नेत्यांनी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या कार्याचे अनेकदा कौतुक केले आहे. शिवसेनेनी नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल राज्याच्या निवडणुकीत भाजपविरोधात तृणमूल काँग्रेसला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता.
दरम्यान, उत्तर प्रदेश निवडणुकीत समाजवादी पक्षाला मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसात त्या वाराणसीलाही जाणार असल्याचं सांगितलं
इतर बाम्या